विशेष प्रतिनिधी
बीड : करूणा मुंडे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी करण्यात आली. परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करूणा मुंडेवर आहे. त्यांना या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी म्हणजेच अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी म्हणजेच 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.Dhananjay Munde: Karuna Munde’s stay extended: Bail hearing on Tuesday
रविवारी म्हणजेच 5 सप्टेंबरला परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा मुंडे आणि अरूण दत्तात्रय मोरे ( दोन्ही रा . मुंबई ) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते . सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती . मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने अरुण मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली .
सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत . बुधवारी दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.मात्र , दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यामुळे करुणा मुंडे यांना किमान मंगळवारपर्यंत कोठडीत राहावे लागणार हे निश्चित झाले आहे.