महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय चालू हे बोलत असतात. महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात एक फुटकी कवडीही दिलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय हे बोलत असतात. महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र एक फुटकी कवडीही दिलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Devendra Fadnavis alleges Maharashtra Government
Devendra Fadnavis alleges Maharashtra Government
फडणवीस म्हणाले की, बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे ही सुरू असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात करायला पाहिजे. मात्र शेतकऱ्यांना देखील मदत करायला हवी. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी केला.