- स्वतःच्या पराभवातून आत्मपरीक्षण करायचे सोडून फडणवीसांचा शिवसेनेलाच आत्मपरीक्षणाचा सल्ला
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून दारूण पराभव झाल्यानंतरही भाजपचे नेते अजूनही जमिनीवर यायला तयार नाहीत. तीन पक्षांच्या एकत्रित ताकदीचा अंदाज आम्हाला आला नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत शिवसेनेलाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. devendra fadanvis news
तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाच हिंमत असेल तर वेगवेगळे लढा ना… असे गल्लीछाप आव्हान देऊन स्वतःची “राजकीय समज” उघडी पाडून घेतली. devendra fadanvis news
महाराष्ट्रातील वातावरण बदलतेय, या शरद पवारांनी सकाळी केलेल्या विधानवर खरेतर अधिक प्रगल्भ राजकीय प्रतिक्रिया फडणवीस आणि पाटील या दोन्ही नेत्यांकडून अपेक्षित होती. परंतु, त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया मात्र, भाजप अजून जमिनीवर यायला तयार नसल्याचेच राजकीय भाष्य करून गेल्या आहेत. devendra fadanvis news
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली. नागपूर, पुणे, औरंगाबाद याासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेलाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
तर हिंमत असेल तर आमच्याशी एकत्र येऊन काय लढता, वेगवेगळे लढून दाखवा ना, असे आव्हान महाविकास आघाडीला दिले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागले नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही.
devendra fadanvis news
तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरे. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचे आत्मचिंतन करावे, असा टोला म्हणे फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला