• Download App
    शिवसेना – भाजप एकत्र येऊ शकतात, असे आठवले म्हणताच...फडणवीसांनी केला बंद दाराआडच्या चर्चेचा खुलासा, फक्त ओबीसी आरक्षणावरच चर्चा...!! devendra fadanavis clarified discussed on OBC reservation with CM uddhav thackeray

    शिवसेना – भाजप एकत्र येऊ शकतात, असे आठवले म्हणताच…फडणवीसांनी केला बंद दाराआडच्या चर्चेचा खुलासा, फक्त ओबीसी आरक्षणावरच चर्चा…!!

    प्रतिनिधी

    मुंबई – शिवसेना – भाजप भविष्यात एकत्र येऊ शकतात, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी करताच… माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहाच्या दालनात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा खुलासा करून टाकला आहे. आमच्यात फक्त ओबीसी राजकीय आरक्षणावर चर्चा झाली, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगून टाकले. devendra fadanavis clarified discussed on OBC reservation with CM uddhav thackeray

    त्यापूर्वी उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बंद दाराआडच्या चर्चेबद्दल रामदास आठवले म्हणाले, की त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मला नेमके माहिती नाही. मात्र या दोघांच्या चर्चेमुळे कदाचित पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा एकत्र येऊ शकतात. नारायण राणे यांना मंत्री केल्याचे शिवसेनेला आवडले नाही. भाजपाच्या जनाशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद शिवसेनेला आवडला नाही. त्यामुळे ते चिडले आहेत. तरीही नारायण राणे यांच्या बद्दलची शिवसेना नेत्यांची वक्तवे योग्य आहेत, असे म्हणता येणार नाही



    नारायण राणेंना अटक करण्याची घाई काय होती? सत्तेचा दुरुपयोग करून सूडबुद्धीने अटक केली. नारायण राणे घाबरणारे नाहीत. शिवसेनेने सत्तेचा दुरुपयोग सूडबुद्धीने केला आहे. शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. नारायण राणेंचं विधान घटनाविरोधी असलं, तरी शिवसेनेचे वक्तव्यं देखील घटनाविरोधी आहे, याकडेही आठवले यांनी लक्ष वेधले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहातील बंद दालनात १५ मिनिटे चर्चा झाली होती. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. त्यावरूनच बरेच तर्क वितर्क लढविले गेले. रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना आपापले खुलासे केले आहेत.

    devendra fadanavis clarified discussed on OBC reservation with CM uddhav thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!