• Download App
    मणिपूरमध्ये आता विकासकामांचा पूर, सगळ्या दहशतवादी संघटनांनी केले आत्मसमर्पण | The Focus India

    मणिपूरमध्ये आता विकासकामांचा पूर, सगळ्या दहशतवादी संघटनांनी केले आत्मसमर्पण

    एकेकाळी सातत्याने पूर येणारे राज्य म्हणून लौकिक असलेल्या मणिपूरमध्ये आता विकासकामांचा पूर आला आहे. राज्यातील सर्व दहशतवादी संघटनांनी आत्मसमर्पण केल्याने हिंसाचार कमी झाला आहे. त्यामुळे राज्य प्रगतीच्या वाटेवर असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितले.

    विशेष प्रतिनिधी

    इंफाळ : एकेकाळी सातत्याने पूर येणारे राज्य म्हणून लौकिक असलेल्या मणिपूरमध्ये आता विकासकामांचा पूर आला आहे. राज्यातील सर्व दहशतवादी संघटनांनी आत्मसमर्पण केल्याने हिंसाचार कमी झाला आहे. त्यामुळे राज्य प्रगतीच्या वाटेवर असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितले. Development work in Manipur is now fast, all terrorist organizations have surrendered

    मणिपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी शहा बोलत होते. ते म्हणाले की, इशान्य भारत हा एकेकाळी फुटीरतावादी चळवळी आणि हिंसाचारासाठी ओळखळा जात होता. मात्र, गेल्या सहा वर्षांत फुटीरतावादी दहशतवादी संघटनांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे हिंसाचार कमी झाला आहे. लवकरच सर्वच्या सर्व फुटीरतावादी संघटना मुख्य प्रवाहात सामील होतील.

    शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील नागरिकांची मागणी नसतानाही त्यांना इनर परमीट दिले आहे. जनतेच्या मनातील आवाज ओळखणारा मोदी यांच्यासारखा दुसरा कोणी नाही. पूर्वी येथे सातत्याने पूर यायचे. आता येथे विकास होत आहे. दहशतवादी संघटनांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

    शहा म्हणाले, दहशतवादामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. रोजीरोटीचा प्रश्न भेडसावात होता. घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस नसायचा. पूर्वी इशान्य भारत हा इमरजन्सी हाँटबेड मानला जायचा. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि योजनांमुळे हा भाग आता विकासाचा हॉटबेड बनला आहे.

    Development work in Manipur is now fast, all terrorist organizations have surrendered

    पंतप्रधान २०१४ मध्ये म्हणाले होते की दोन्ही हात मजबूत असायला हवेत आणि इशान्य भारत हा देशाचा दुसरा हात आहे. हे आश्वासन त्यांनी पूर्ण केल्याचे सांगून शहा म्हणाले, मणिपूरमध्ये पूर्वी सगळ्यात मोठी समस्या कायदा आणि सुव्यवस्था होती. परंतु, भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मणिपूर विकासाच्या मार्गावर चालू लागले आहे. आम्ही सांगितले होते की पूर्ण बहुमत द्या आणि आम्हाला सेवेची संधी द्या. आपला विश्वास आम्ही सार्थ ठरविला आहे. गेल्या तीन वर्षांत मणिपूरचा चेहराच बदलून गेला आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??