विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : केंद्राच्या तीन कृषी कायद्याला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी पाठींबा दिला असून कायदे खुल्या दिलाने स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. Deve Gowda’s ‘JDS’ supports agricultural laws!
कुमारस्वामी यांनी सांगितले की, “एका दुष्टचक्रात भारतीय कृषी क्षेत्र अडकले आहे. त्यामुळे शेतीच्या कल्याणासाठी कोणतेही प्रयोग करण्याची गरज आहे. त्याद्वारे कृषी क्षेत्र दुष्परिणामांतून वाचेल. म्हणूनच, मला असे वाटते की, नवीन कायदे शेतकऱ्यांनी खुल्या दिलाने स्वीकारावे. तसेच केंद्र आणि आंदोलक यांच्यात समन्वयाची गरज आहे. ”
Deve Gowda’s ‘JDS’ supports agricultural laws!
Deve Gowda’s ‘JDS’ supports agricultural laws!
Deve Gowda’s ‘JDS’ supports agricultural laws!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि निदर्शक यांच्यात झालेल्या निर्णायक बैठकीसाठीही कुमारस्वामी यांनी प्रमुख भूमिका वठवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाने मिळवलेली प्रतिष्ठा या प्रश्नावरून गमावू नका, असे आवाहन त्यांनी केले.