• Download App
    DELMICRON : Omicron पाठ सोडत नाही...त्यातच आता नवा व्हेरिएंट DELMICRON आला ... DELMICRON

    DELMICRON : Omicron ची दहशत सुरू असतानाच… आता नवा व्हेरिएंट DELMICRON आला …

     विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगभरात ओमिक्रॉनचे व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. भारतात, केंद्र सरकारने राज्यांना प्रत्येक स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अंदाज लावला जात आहे की, 2022 मध्येही कोरोना महामारीपासून मुक्तता मिळणार नाही. कारण ओमिक्रॉननंतर आता आणखी एक नवा व्हेरिएंट समोर आला असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.DELMICRON

    नव्यानेच आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटशी अवघं जग झगडत आहे. अशातच आता कोरोनाचा आता आणखी एक व्हेरिएंट ‘डेल्मिक्रॉन’ (Delmicron)ने सर्वांची चिंता वाढवली आहे. वास्तविक, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, युरोप आणि अमेरिकेतील केसेस वाढण्यामागे Delmicron व्हेरिएंट जबाबदार आहे.

    काय आहे Delmicron व्हेरिएंट?

    मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या म्युटेशनने नवा व्हेरिएंट Delmicron हा नवीन व्हेरिएंट तयार झाला आहे. या व्हेरिएंटने अमेरिका आणि युरोपमध्ये अक्षरश: कहर निर्माण केला आहे.

    प्राध्यापक डॉ. संजय राय-

    एका वृत्तवाहिनीला (AIIMS) प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

    डेल्टा आणि ओमिक्रॉन यांनी मिळून डेल्मिक्रॉन व्हेरिएंट बनवल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या डेटावरून Omicron हा व्हेरिएंट समोर आला आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, हा व्हेरिएंट खूप संसर्गजन्य आहे.

    ते पुढे असंही म्हणाले की, कोरोनाचा व्हेरिएंट सातत्याने म्युटेशन बदलत असते. अशा परिस्थितीत, दोन किंवा अधिक व्हेरिएंट एकत्र करून नवीन व्हेरिएंट तयार करू शकतात. आतापर्यंत 30 हून अधिक म्युटेशन समोर आले आहेत.

    डॉ. संजय राय यांनी असेही सांगितले की, हा व्हेरिएंट किती धोकादायक असू शकतो हे आम्ही आतापासून सांगू शकत नाही.

    यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाचा कोणता व्हेरिएंट हा आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त घातक ठरू शकतो हे येणारा काळच सांगेल.

    DELMICRON

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र