विशेष प्रतिनिधी
अमरावती : केवळ फी भरली नाही. त्यामुळे दहावीत कमी गुण दिले गेले. तसेच जोपर्यंत फी भरत नाही. तो पर्यंत टीसी मिळणार नाही, असे सांगितले, असा आरोप करून एका विद्यार्थ्याने करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. Deliberately low marks in the tenth; Student fasting begins in Amravati
कोरोना काळात सर्वांच आर्थिक कंबरड मोडले आहे. ,कोणत्याही शाळेने सक्तीने विद्यार्थ्यांकडून फी वसूल करू नये, असे सरकारने सांगितले होते. मात्र अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलने फी न भरल्याने अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्याचा कमी गुण दिले. जो पर्यंत फी भरत नाही. तो पर्यंत टीसी मिळणार नाही, असे सांगितले.
त्यामुळे आज विद्यार्थ्यांने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यावेळी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपोषण स्थळी भेट दिली. तसेच खंत व्यक्त विद्यार्थ्यांची माफी मागितली. सदर शाळेवर फौजदारी कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना शिक्षणाधिकारी व जिल्हापरिषद मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.
दहावीत मुद्दामून कमी गुण; विद्यार्थ्याचे उपोषण सुरु
जो पर्यंत फी भरत नाही. तो पर्यंत टीसी देणार नाही
राज्यमंत्री कडू यांनी मागितली विद्यार्थ्याची माफी
शाळेवर कारवाई करण्याचे काढले आदेश
फौजदारी कारवाई करून मान्यता रद्दचा प्रस्ताव