विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तुमच्यापेक्षा आमची शिक्षण व्यवस्था चांगली आहे, असा दावा दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांनी केला आहे. पण या वादात आता उत्तरप्रदेशातील भाजप कार्यकर्ते कपिल मिश्रा यांनी उडी घेतली असून दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. Delhi’s education model
दिल्लीपेक्षा उत्तरप्रदेशची शिक्षण व्यवस्था खराब असल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री ,शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. त्यावर उत्तरप्रदेशातील मंत्र्यांनी आणि शिक्षणमंत्री सतीश द्विवेदी यांनी प्रतिआव्हान देत थेट त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या पार्श्वभूमीवर कपिल यांनी ट्विट केले.
मिश्रा यांनी दिल्लीची शिक्षण व्यवस्था अत्यंत खराब असल्याचा दावा केला असून त्याची आकडेवारीच जाहीर केली.
Delhi’s education model
ट्विटमध्ये ते म्हणतात,
- नववीतील 50 टक्के विद्यार्थी नापास आहेत.
- 2000 कोटींचा शिक्षण तरतूद निधी परत पाठविला.
- सरकारी शाळेतील 1 लाख 50 हजार मुले खासगी शाळेत.
- मैदाने, ग्रंथालये, प्रयोगशाळेत 50 टक्के कमी मुले.
- 70 टक्के शाळेत मुख्याध्यापकच नाहीत.
- बारावीत जाणारे विद्यार्थी 45 टक्के कमी.
50% बच्चे नौवीं में फेल
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) December 23, 2020
₹2000 करोड़ का शिक्षा बजट बिना खर्च वापस
1 लाख 50 हजार बच्चे सरकारी स्कूल छोड़कर प्राइवेट स्कूल में
स्पोर्ट्स ग्राउंड, लाइब्रेरी, विज्ञान लैब में 50% कमी
70% स्कूलों में प्रिंसिपल नहीं
12 वी में जाने वाले छात्रों में 45% की कमी
जवाब दो @msisodia pic.twitter.com/SPyt2DvmRT