विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू – काश्मीरच्या मुद्द्यावर महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सगळे नेते ७ लोककल्याण मार्गावर दाखल झाले आहेत. चर्चा सुरू झाल्याची बातमी आहे. Delhi: Jammu & Kashmir Lt Governor Manoj Sinha arrives at 7 Lok Kalyan Marg, Prime Minister’s official residence
जम्मू – काश्मीर संदर्भात कोणते मुद्दे बैठकीत येणार?, याची मोठी उत्सुकता असाताना या बैठकीबाबत मोठ्या आशा, अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर काही वास्तव मुद्द्यांवर देखील चर्चा होणार आहे.
- जम्मु कश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा. कलम ३७० पुन्हा लागू करावे, ही काश्मीरी राजकीय घराण्यांमधील नेत्यांची मोठी आशा आणि अपेक्षा आहे. पण त्याला मोदी सरकारकडून वास्तववादी प्रत्युत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे.
- जम्मू – काश्मीरच्या राजकीय कैद्यांना सोडण्याची काश्मीर नेत्यांची मागणी आहे. त्यावर मोदी सरकार काही सकारात्मक उत्तर देण्याची अपेक्षा आहे.
- जम्मू – काश्मीरमध्ये मोदी सरकारने लागू केलेल्या सर्व विकास योजनांची सविस्तर माहिती मोदी सरकारचे प्रतिनिधी सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित नेत्यांना देणार आहेत.
- राज्यात निवडणूका घेण्याच्या दृष्टीने मतदारसंघांचे परिसीमन करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्व बाजूंनी चर्चा होऊन आशा – अपेक्षा व्यक्त होतील. मोदी सरकार त्यावर सहमती तयार करण्याचा प्रयत्न करून वास्तववादी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल, असे सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारचे प्रतिनिधी स्पष्ट करण्याची शक्यता आहे.