• Download App
    स्वतःच्या प्रगतीची व्याख्या ठरवा Define your own progress

    स्वतःच्या प्रगतीची व्याख्या ठरवा

    प्रगतीची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. आपल्याला ज्यात आनंद वाटेल, प्रगती वाटेल तसेच दुसऱ्याला वाटेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतपुरती प्रगतीची व्याख्या नेमकेपणाने निश्चित करावी. आपण सारेच आपली प्रगती ही कुणीतरी आपल्या जवळचे, मित्र, शेजारी यांच्याशी तुलना करत तोलत असतो. Define your own progress

    म्हणूनच त्याच्यापेक्षा जास्त. या साठी हि सारी धावाधाव करत असतो. तुलना करणेही वाईट नाही. कधी कधी त्याला लाभही होतो. मात्र प्रत्येक वेळी तुलना करणेही चांगलेही नाही.
    तुम्ही त्याच्यासारखे होता किंवा त्याच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करता म्हणजे स्वतःतील वैशिष्ट्य गमावत असता. म्हणूनच स्वतःला स्वतःच्या बुद्धीला स्वतःचे वैशिष्ट्य जपत वाढवा. कुणापेक्षा मोठे वाढावे यासाठी नाही, मात्र कुणासाठी काही करावे म्हणून हातून काही व्हावे या हेतूने कार्य करण्यासाठी बुद्धीला तयार करा.

    सर्वसामान्य असणे हे ही चांगलेच असते. कारण सर्वसामांन्याच्याबरोबर आपल्या बुद्धीचा नाळ जोडली तर आपल्या आजूबाजूला मदत करण्यासाठी, मदत देण्यासाठी, तुम्हाला जे काही वाटते ते सांगण्यासाठी, रडण्यासाठी, हसण्यासाठी, मित्राप्रमाणे खांद्यावर हात टाकून फिरण्यासाठी कुणीतरी तुमच्यापाशी असतं. तुम्ही इतरांपेक्षा मी माझ्या बुद्धीने वेगळा आहे, तुमच्यापेक्षा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या आसपास दु खाच्या वा आनंदाच्या क्षणीही कुणी नसेल. म्हणूनच सर्वसामान्य बुद्धीमत्ता असणे हेही थोडके नाही.

    एक सुंदर विचार आहे. तुम्हाला जास्त लवकर लवकर इच्छित स्थळी जायचे असेल तर एकटे जा, मात्र त्याहीपेक्षा जास्त पुढे जायचे असेल, दूरवर जायचे असेल तर सर्वांबरोबर चला. विचारा तुमच्या बुद्धीला. नेमके तुम्हाला काय हवे आहे. त्याप्रमाणे वागण्यास सुरुवात करा. म्हणजे प्रगतीत कधीही अडसर येणार नाही. तसेच मेंदूवर ताणही येणार नाही. शेवटी मेंदूवर ताण आला की कोणतेही काम योग्य प्रकारे होत नाही हे वेगळे सांगायला नको.

    Define your own progress

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!