• Download App
    बांधकाम कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे देवेगौडा यांना आदेश Defamation of a construction company ; Deve Gowda ordered to pay Rs 2 crore

    बांधकाम कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे देवेगौडा यांना आदेश

    वृत्तसंस्था

    बंगळूर : एका बांधकाम कंपनीची बदनामी करून नुकसान केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. Defamation of a construction company ; Deve Gowda ordered to pay Rs 2 crore

    नंदी इंफ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर इंटरप्रायजेस, असे कंपनीचे नाव आहे. २०११,मध्ये देवेगौडा यांनी कंपनीविरोधात एका वाहिनीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कंपनीचे १०कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. देवेगौडा सुद्धा न्यायालयात त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण किंवा खुलासे करण्यात अपयशी ठरले होते. तसेच देवेगौडा यांनी भविष्यात अशी विधाने करू नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

    विशेष म्हणजे कंपनीच्या प्रकल्पाबाबत कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले असताना देवेगौडा यांनी बदनामीकारक वक्तव्य करून कंपनीचे नुकसान केले होते.

    Defamation of a construction company ; Deve Gowda ordered to pay Rs 2 crore

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये