• Download App
    Dagdusheth Halwai Ganpati's Darshan, you can enjoy Shri's Aarti from home

    दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन अन् मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरतीचा घरूनच घेता येणार आनंद

    विशेष प्रतिनिधी

    पुणे:  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येणार आहे.
    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. Dagdusheth Halwai Ganpati’s Darshan, you can enjoy Shri’s Aarti from home

    बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी करण्यात आली.

    भाविकांना बाप्पाचे दर्शन अगदी सहज होण्यासाठी यंदा ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रामुळे जास्तीत जास्त भक्तांना ऑनलाईन दर्शनाला लाभ घेता येणार आहे.

    याकरीता ट्रस्टतर्फे दिलेल्या http://www.DagdushethGanpati.net या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येणार आहे.

    Dagdusheth Halwai Ganpati’s Darshan, you can enjoy Shri’s Aarti from home

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!