• Download App
    श्रीमंत दगडूशेठ गणपतीची यंदा मंदिरामध्येच स्थापना Dagdusheth Ganapati Established in the temple itself

    श्रीमंत दगडूशेठ गणपतीची यंदा मंदिरामध्येच स्थापना ; कोरोनामुळे गणेश भक्तांच्या आरोग्याला प्राधान्य

    प्रतिनिधी

    पुणे : सलग दुस-या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. Dagdusheth Ganapati Established in the temple itself

    ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभा-यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अ

    शी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निर्णयाचे स्वागत केले.

    •  श्रीमंत दगडूशेठ गणपतीची यंदा मंदिरातच स्थापना
    •  कोरोना धोक्यामुळे मंदिर परिसरातच विसर्जन
    •  विसर्जन मिरवणुकीला परवानगी यंदाही नाही
    •  बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन व कार्यक्रमांवर भर

    Dagdusheth Ganapati Established in the temple itself

    Related posts

    अशोक खरातच्या भोंदू उद्योगात, राष्ट्रवादीचेच नेते संशयाच्या घेऱ्यात!!

    भाषा तोंडात पुरोगामी, पण “पवार संस्कारित” लागले भोंदू बाबांच्या नादी!!

    प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू!!