- केंद्रीय राखीव पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना सीआरपीएफमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दलात अधिकारी (CRPF Recruitment 2021) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना सीआरपीएफमध्ये (CRPF Recruitment 2021) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सीआरपीएफने असिस्टंट कमांडंट (सिव्हिल इंजिनिअर) पदांच्या भरतीसाठी (CRPF Recruitment 2021) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी (CRPF Recruitment 2021) सीआरपीएफच्या crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून 2021 पासून सुरु होणार आहे. तर 29 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.CRPF Recruitment 2021
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार थेट या लिंकवर https://crpf.gov.in/ जाऊन अर्ज करु शकतात. त्यासोबतच ते http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_19140_30_2122b.pdf या लिंकवर जाऊन अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25 पदं भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची तारीख – 30 जून 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 जुलै 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.