• Download App
    ई-पासशिवाय गोव्याला जाणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉला दणका ; आंबोलीमध्ये अडविले Cricketer Pruthvi show is not permitted for travel to Goa. Because he had no E travel pass.

    ई-पासशिवाय गोव्याला जाणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉला दणका ; आंबोलीमध्ये अडविले

    वृत्तसंस्था

    आंबोली : राज्यात लॉकडाऊन वाढविल्याचे घोषित झाले असताना सरकारने प्रवासासाठी ई पासची अट लागू केली आहे. पण, क्रिकेटपटू पृथ्वी शाह याला मित्रांसमवेत गोव्याला जाताना आंबोली पोलिसांनी रोखले. चौकशीत त्याच्याकडे पास नसल्याचे आढळले होते.Cricketer Pruthvi show is not permitted for travel to Goa. Because he had no E travel pass.

    पृथ्वी शॉ हा मोटारीने मित्रांसोबत मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला जात होता. आंबोली पोलिसांनी ई-पासची मागणी केली. ई-पास नसल्याने पुढील प्रवास करता येणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं.



    यानंतर पृथ्वी शॉने मोबाइलवरुन ई-पाससाठी अर्ज केला. एका तासात त्याला ई-पास मिळाला.नंतरच त्याला पुढे जाण्याची परवानगी मिळाली.

    पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली संघातून खेळत होता. कोरोनामुळे स्पर्धा स्थगित झाली आहे. अनेक क्रिकेटर्स कुटुंबासोबत वेळ घालवत असताना पृथ्वीने मित्रांसोबत गोव्याला जाणं पसंत केलं. मात्र, नियमांचं पालन न करणं त्याला महागात पडलं. पास नसल्याने तासाहून अधिक वेळ मोटारीमध्येच थांबावं लागले होते.

    Cricketer Pruthvi show is not permitted for travel to Goa. Because he had no E travel pass.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आणीबाणीच्या काळ्या पर्वावरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; पण इंदिरा गांधींनी come back कसे केले सांगण्यावर काँग्रेसचा भर!!

    द फोकस एक्सप्लेनर : इराणसाठी युद्धाचे 5 मोठे धडे: इजरायलच्या हल्ल्यांमधून काय शिकले पाहिजे?

    Mamatha Banerjee ममता बॅनर्जींचा डाव त्यांच्याच तोंडून उघड; भारताने हाकललेल्या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल मध्ये आणताहेत परत!!