• Download App
    ICC AWARD:ICC-महिला टी20 प्लेयर ऑफ द ईयर सोबतच सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठी भारताच्या स्मृती मांधनाला नामांकन ! एकाही भारतीय पुरूष खेळाडूला स्थान नाही ... CRICKET ICC AWARD: ICC nominates Smriti Mandhana of India for Women's T20 Player of the Year! No Indian male player has a place ...

    ICC AWARD:ICC-महिला टी20 प्लेयर ऑफ द ईयर सोबतच सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठी भारताच्या स्मृती मांधनाला नामांकन ! एकाही भारतीय पुरूष खेळाडूला स्थान नाही …

    2021 च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूंची नामांकन यादी जाहीर

    या यादीत स्मृती मांधनालाही स्थान


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली:आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी निवडलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मांधना हिला सर्व फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकन देण्यात आले आहे.CRICKET ICC AWARD: ICC nominates Smriti Mandhana of India for Women’s T20 Player of the Year! No Indian male player has a place …

     

    याआधी गुरुवारी मांधनाला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला T20 खेळाडूच्या श्रेणीतही स्थान मिळाले.

    इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉन्ट, दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली आणि आयर्लंडच्या गॅबी लुईससह मंधानाला सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय) वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. 23 जानेवारी रोजी विजेत्याची घोषणा केली जाईल.

    डावखुरी सलामीवीर स्मृती मांधनासाठी 2021 हे वर्ष उत्कृष्ट ठरलं. कसोटी क्रिकेट, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये मंधानानं बॅटनं फटकेबाजी केली. याशिवाय महिला टी-20 लीगमध्येही तिची कामगिरी अप्रतिम होती. महिलांची बिग बॅश असो किंवा इंग्लंडमध्ये आयोजित द हंड्रेड स्पर्धा, दोन्ही ठिकाणी मंधानाची जादू चालली. आता वर्षाच्या शेवटच्या दिवशी मंधानाला आयसीसीनं मोठा सन्मान दिलाय.

    स्मृती मंधाना हिची ICCनं 2021या वर्षातली सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठी नामांकन केलंय. स्मृती मंधाना हिला बुधवारी महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळालं होतं.

    स्मृती मंधानानं 2021मध्ये मोठी कामगिरी केली. तिनं या वर्षी 2 कसोटीत 61च्या सरासरीनं 244 धावा केल्या आणि दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

    यावर्षी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.20च्या सरासरीनं 352 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 85पेक्षा जास्त होता. तिनं 2 अर्धशतकं झळकावली. T20मध्ये मंधानानं 9 T20 डावांमध्ये 31च्या सरासरीनं 255 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

     

    स्मृती मंधानाव्यतिरिक्त, आयसीसीनं टॅमी ब्युमॉन्ट, लिझी ली आणि गॅबी लुईस यांना वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी नामांकन दिलंय. अशा स्थितीत मंधानाला कडवी झुंज मिळणार आहे.

    CRICKET ICC AWARD: ICC nominates Smriti Mandhana of India for Women’s T20 Player of the Year! No Indian male player has a place …

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!