- सप्टेंबर महिन्यात भारताला आणखी एक लस मिळू शकते. अमेरिकन कंपनी नोव्हावाक्सच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ही लस भारतात विकसित करीत आहे.
- अमेरिकेच्या बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोव्हावॅक्सने कोव्होव्हॅक्स नावाच्या कोविड -19 ची लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) शी करार केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, त्याच्या नॅनो-पार्टिकल प्रोटीन-आधारित लसने फेज 3 क्लिनिकल चाचण्यांमध्ये एकूण 90.4 टक्के कार्यक्षमता दर्शविली आहे.
- कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादन सिरम करीत आहे. या लशीने परिणामकारकतेत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला मागे टाकले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑक्सफोर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड कोरोना लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. याचबरोबर कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादनही सिरम करीत आहे. या लशीने परिणामकारकतेत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला.मागे टाकले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोव्होव्हॅक्स लशीचे 20 कोटी डोस भारताला उपलब्ध होतील, अशी शक्यता केली जात आहे.COVOVAX: Serum’s new Covovax corona vaccine replaces Covishield and Covacin; Soon 200 million doses of Kovovax will be available in India
कोव्होव्हॅक्स लस नोव्होव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. अमरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. याविषयी नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे की, मध्यम ती तीव्र स्वरुपाच्या कोरोना संसर्गापासून ही लस 100 टक्के संरक्षण देते. याचवेळी एकूण 90.4 टक्के संरक्षण ही लस देते. अमेरिका आणि मेक्सिकोतील 119 शहरांमध्ये या चाचण्या करण्यात आल्या. यात 29 हजार 960 जणांचा सहभाग होता. यावर्षातील तिसऱ्या आठवड्यात या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येणार आहे.
या लसीची परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत 90.4 टक्के आहे. अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना यांच्या कोरोना लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतील परिणामकारकता अनुक्रमे 91.3 टक्के आणि 90 टक्के आहे. याचवेळी कोव्हिशिल्डची परिणामकारकता 76 टक्के (अमेरिकेतील चाचण्या) आणि कोव्हॅक्सिनची परिणामकारकता 81 टक्के आहे.
सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर होत आहे. परिणाकारतेचा विचार केल्यास ही लस कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनरपेक्षा अधिक प्रभावी आहे. देशात स्पुटनिक व्ही या लशीचा काही प्रमाणात वापर सुरू आहे. स्पुटनिक व्ही लशीची परिणामकारकता 91.6 असून, जवळपास कोव्होव्हॅक्स लशीएवढीच आहे. कोव्होव्हॅक्स ही लस मध्यम ते तीव्र कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळवून देत आहेत.
कंपनी लशीचे दरमहा 10 कोटी डोस उत्पादित करणार आहे. तिसऱ्या तिमाहीअखेर हा आकडा दरमहा 15 कोटींवर जाईल. जागतिक आरोग्यव्यवस्थेवर आलेल्या कोरोना संकटाच्या काळात ही लस महत्वाची भूमिका बजावणार आहे. जगातील स्थिती पाहता सध्याच्या काळात लशीची अतिशय आवश्यकता आहे, असेही नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे.