• Download App
    स्वदेशी Covaxin चा डंका : कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असल्याचे शिक्कामोर्तब, आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलकडूनही कौतुक । Covaxin gets international recognition again, scientific research data published demonstrating protection against All Corona Variants

    स्वदेशी Covaxin चा डंका : कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असण्यावर शिक्कामोर्तब, आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलकडून कौतुक

    Covaxin : अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीजने रविवारी कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोव्हॅक्सिन भारतात आढळलेल्या डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंटविरुद्ध मोठ्या प्रमाणात संरक्षण देते. यासोबतच ही लस ब्रिटनमध्ये आढळलेल्या व्हेरिएंटसहित अनेक इतर स्ट्रेनचाही खात्मा करते. यापूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही (ICMR) कोव्हॅक्सिनला सर्व प्रमुख व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असल्याचे सांगितले होते. Covaxin gets international recognition again, scientific research data published demonstrating protection against All Corona Variants


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीजने रविवारी कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोव्हॅक्सिन भारतात आढळलेल्या डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंटविरुद्ध मोठ्या प्रमाणात संरक्षण देते. यासोबतच ही लस ब्रिटनमध्ये आढळलेल्या व्हेरिएंटसहित अनेक इतर स्ट्रेनचाही खात्मा करते. यापूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही (ICMR)कोव्हॅक्सिनला सर्व प्रमुख व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असल्याचे सांगितले होते.

    तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिन 78% प्रभावी

    कोरोना व्हॅक्सिन बनवणारी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक आणि आयसीएमआरनेही नुकतेच कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतरिम क्लिनिकल ट्रायलची रिपोर्ट जारी केली होती. रिपोर्टमध्ये भारतात निर्मित कोव्हॅक्सिनला क्लिनिकली 78% आणि कोरोनामुळे गंभीर झालेल्या रुग्णांवर 100% प्रभावी असल्याचे सांगितले होते. कंपनीने आपल्या दुसऱ्या विश्लेषणात कोरोनाच्या 87 लक्षणांवर संशोधन केले होते.

    नंतर संसर्ग वाढल्यानंतर कंपनीने तिसऱ्या टप्प्यासाठी 127 लक्षणांवर विश्लेषण केले. यात कोव्हॅक्सिनची एफिकेसी 78% पर्यंत आढळली. कंपनी लसीचा अंतिम अहवाल जूनमध्ये जाहीर करणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील स्टडीमध्ये 18 ते 98 वर्षांमधील 25,800 जणांना सहभागी करण्यात आले होते. यात 60 हून वयाचे 10 टक्के लोक सहभागी होते.

     

     

    स्वदेशी लसीचा जागतिक स्तरावर डंका

    भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनला ट्रेडिशनल प्लॅटफॉर्मवर बनवले आहे. यात निष्क्रिय विषाणू शरीरात सोडला जातो. तो शरीरात वाढू शकत नाही, परंतु लढण्यासाठी अँटीबॉडी जरूर तयार करतो. चांगली बाब अशी की, या अँटीबॉडी संपूर्ण विषाणूला लक्ष्य करतात. यामुळे त्यात होणाऱ्या बदलांवरही ती प्रभावी आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे, कोव्हॅक्सिन ही जगातील पहिली अशी लस आहे, जी सर्व व्हेरिएंट्सविरुद्ध लढण्यास सक्षम आहे.

    कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सविरुद्ध कोव्हॅक्सिन प्रभावी

    भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कृष्णा एल्ला म्हणाले की, क्लिनिकल ट्रायल्सच्या तीन टप्प्यांत 27 हजार स्वयंसेवकांवर लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सच्या निकालांवरून हे सिद्ध झाले आहे की, कोव्हॅक्सिन कोरोना व्हायरसविरुद्ध प्रभावी आहे. ही लस वेगाने समोर येणाऱ्या कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरिएंट्सविरुद्धही प्रभावी आहे.

    कोव्हॅक्सिनची नासाडीही कमी

    कोव्हॅक्सिन ही लस एक पूर्णपणे निष्क्रिय विषाणूंद्वारे बनवलेली लस आहे. ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानावर राहू शकते. सध्या देशात असलेल्या लस पुरवठा साखळीसाठी या लसीचे दळणवळण सहज शक्य आहे. या लसीसोबतच 28 दिवसांची ओपन व्हॉयल पॉलिसीसुद्धा आहे. यामुळे लसीची नासाडी 10 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी होते.

    Covaxin gets international recognition again, scientific research data published demonstrating protection against All Corona Variants

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य