वृत्तसंस्था
मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. परंतु राज्यात कोरोनाचा डेल्टाचा नवा व्हेरिएंट आढळून आला असून ७ रुग्ण आढळले आहेत. CoronaVirus News Maharashtra reports Delta plus variant one district has higher cases
रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघरमध्ये डेल्टा प्लसचे सात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता याच व्हेरिएंटचं म्युटेशन झालं आहे. त्यामुळे जोखीम वाढली आहे.
कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यासाठी डेल्टा प्लस कारणीभूत असेल, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने तज्ज्ञाच्या हवाल्यानं दिलं आहे. या व्हेरिएंटमुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ ते १० लाखांपर्यंत जाऊ शकते आणि यातील १० टक्के रुग्ण लहान मुलं असू शकतात, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञानी दिला आहे. नवा व्हेरिएंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
‘नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. आम्ही काही नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल,’ अशी माहिती डीएमईआरचे संचालक डॉ. लहाने यांनी दिली. डेल्टा प्लसचे ५ रुग्ण रत्नागिरीत आढळले आहेत. या ठिकाणी १० जूनपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट १३.७ टक्के इतका होता. याच कालावधीत राज्यातील सरासरी पॉझिटिव्हिटी रेट ५.७ टक्के होता.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्गात संसर्ग वाढला आहे.