• Download App
    शेतकरी आंदोलनामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट? पाहा पब्लिक डोमेनवरील आकडेवारी काय सांगते! । Coronavirus Data shows that Farmers Protest is Major Cause Behind Second Wave Of Covid-19 In India

    शेतकरी आंदोलनामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट? पाहा पब्लिक डोमेनवरील आकडेवारी काय सांगते!

    Cause Behind Second Wave Of Covid-19 In India : भारत सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करत आहे. महामारीची ही लाट पूर्वीपेक्षा जास्त विनाशकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. या लाटेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या निर्माण झाल्याने अस्तित्वात असलेल्या आरोग्य सुविधांवर मोठा ताण आला. यामुळे बेड्स, ऑक्सिजन, औषधी अशा सर्व बाबींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. परंतु या लाटेची सुरुवात कशी झाली? देशात कोरोना नियंत्रणात येत असताना पुन्हा वाढीला कसा लागला? अशाच प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न स्वराज्य मॅगझिनने आपल्या डेटा स्टोरीच्या माध्यमातून केला आहे. Coronavirus Data shows that Farmers Protest is Major Cause Behind Second Wave Of Covid-19 In India


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करत आहे. महामारीची ही लाट पूर्वीपेक्षा जास्त विनाशकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. या लाटेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या निर्माण झाल्याने अस्तित्वात असलेल्या आरोग्य सुविधांवर मोठा ताण आला. यामुळे बेड्स, ऑक्सिजन, औषधी अशा सर्व बाबींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. परंतु या लाटेची सुरुवात कशी झाली? देशात कोरोना नियंत्रणात येत असताना पुन्हा वाढीला कसा लागला? अशाच प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न स्वराज्य मॅगझिनने आपल्या डेटा स्टोरीच्या माध्यमातून केला आहे.

    ‘स्वराज्य’मधील डेटा स्टोरीनुसार, साधारणपणे असे समजले जाते की फेब्रुवारी 2021 च्या मध्यापासून महाराष्ट्रातून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली, असे समजले जात आहे. यानंतर काही आठवड्यांतच ही लाट देशाच्या इतर भागांतही पसरली. लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाला या महामारी ग्रासले. परंतु हे वास्तव नाही. स्वराज्यच्या डेटा स्टोरीनुसार, पंजाबात दुसऱ्या लाटेची सुरुवात जानेवारी 2021च्या प्रारंभी शेतकरी आंदोलनातून सुरू झाली, याचे केंद्र तेथेच होते. एवढेच नव्हे, तर यूकेचा नवा स्ट्रेनही तेथूनच पसरायला सुरुवात झाली होती.
    ही लाट पंजाब, हरियाणाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये गेली. लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराच्या ठीक पंधरा दिवसांनी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. याच्या परिणामी, यूकेचा नवा स्ट्रेन राजधानीतील बहुतांश भागात पसरायला लागला होता.

    स्वराज्य मॅगझिनने पब्लिक डोमेनवर उपलब्ध असलेल्या डेटाचे अध्ययन करून ही स्टोरी केली आहे. यासंबंधी त्यांनी अनेक पुरावेही सोबत जोडले आहेत. यामध्ये कोरोना रुग्णसंख्येच्या शहरनिहाय आलेखाचे बारकाईने अध्ययन करून तारखेनुसार विश्लेक्षण करण्यात आले आहे. (स्वराज्यची मूळ स्टोरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

    यानुसार पंजाबमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला दिसलेली वाढ, नंतर महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरपासून दिसायला लागल्याचे दर्शवण्यात आले आहे. यासाठी त्यांनी coivd19india.org वरील डेटाची मदत घेतली आहे. हा डेटा सर्वांसाठी उपलब्ध आहे.

    शेतकरी आंदोलनाबाबत यापूर्वीही वारंवार तज्ज्ञांनी इशारा दिला होता की, अशा प्रकारे महामारीच्या काळात आंदोलन केल्याने मोठा धोका उद्भवू शकतो. ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क, बेजबाबदारपणे विविध राज्यांतून हजारोंच्या संख्येने तेथे लोकांचे जमा होणे यामुळे आजाराचा आणखीनच प्रसार झाल्याचे त्यात म्हटले आहे. या डेटा स्टोरीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उगम शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी दाखवण्यात आला आहे. जानेवारी 2021च्या सुरुवातीला चंदिगडमध्ये याला सुरुवात झाली. येथे प्रजासत्ताक दिनाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक अनिवासी भारतीय यूकेहून भारतात दाखल झाले होते. ब्रिटनमध्ये तेव्हा कोरोनाची लाट सर्वोच्च शिखरावर होती. अशाप्रकारे भारतात कोरोनाच्या यूके स्ट्रेनचा शिरकाव झाला. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ही लाट देशाच्या राजधानीत पोहोचली आणि नंतर देशाच्या विविध भागांत त्याचा प्रकोप सुरू झाल्याचे या लेखात म्हटले आहे.

    (टिप : स्वराज्य मॅगझिनची मूळ डेटा स्टोरी तुम्ही येथे वाचू शकता.)

    Coronavirus Data shows that Farmers Protest is Major Cause Behind Second Wave Of Covid-19 In India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार