• Download App
    कोरोनावर केंद्र सरकारचा डाएट प्लॅन, या पदार्थांचा आहारात करा समावेश Corona's central government's diet plan, including these foods in the diet

    कोरोनावर केंद्र सरकारचा डाएट प्लॅन, या पदार्थांचा आहारात करा समावेश

    कोरोनापासून वाचण्यासाठी आणि त्यातून बरे झाल्यावर शरीरातील रोग प्रतिकारशक्ती आणि उर्जा वाढावी यासाठी केंद्र सरकारने एक डाएट प्लॅन सांगितला आहे. केंद्र सरकारकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर काही पदार्थांची यादी टाकण्यात आली आहे. Corona’s central government’s diet plan, including these foods in the diet


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनापासून वाचण्यासाठी आणि त्यातून बरे झाल्यावर शरीरातील रोग प्रतिकारशक्ती आणि उर्जा वाढावी यासाठी केंद्र सरकारने एक डाएट प्लॅन सांगितला आहे. केंद्र सरकारकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर काही पदार्थांची यादी टाकण्यात आली आहे.

    कोणताही आजार होऊ नये आणि कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी निरोगी आणि तंदुरस्त ठेवणारा आहार घेणं गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही पदार्थांची यादी तयार करत ती नागरिकांना शेअर केली आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात तुमच्या शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.



    “कोरोना काळात डार्क चॉकलेट, हळदीचं दूध, प्रोटिन पदार्थ असा काही बेसिक डाएट प्लॅन सुचवला आहे. त्याचे पालन केल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती आणि स्नायूंची शक्ती, ऊर्जा वाचवण्यात मदत होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यचाबरोबर कोरोना रुग्णांनी मुख्यत: स्नायू आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी नाचणी, ओट्स, अमरनाथ यासारख्या धान्याचा वापर आहारात करायला हवा.

    कोंबडीचे मांस, मासे, अंडी, सोया नट, चीज यासारखे पदार्थ खाल्यानेही प्रोटीन मिळते. त्याचसोबत बदाम, आक्रोड, मोहरी तेल, आॅलिव्ह आॅईल यासारख्या गोष्टीचा वापर करावा. नियमित शारिरीक हालचाल, योग आणि व्यायाम करणं आवश्यक आहे. चिंतामुक्त होण्यासाठी ७० टक्के कोको प्रमाण असलेले डार्क चॉकलेट खावे. शरीरासाठी आवश्यक विटामिन घेण्यासाठी ताजी फळं, लिंबू, लाल पपई, नारंगी रंगाची संत्री इत्यादी रोजच्या आहारात समाविष्ट केले जावे. दिवसातून एकदा हळदीचं दूध प्या. आहारात आंबा पावडरचा समावेश करणेही गरजेचे आहे.

    कोरोनाच्या काळात अनेकांना चव, गंध न येण्यासोबत जेवण खातानाही त्रास होतो. अशावेळी काही मऊ पदार्थ खावेत. कोरोनापासून वाचण्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार करावा. यात चिकन, मासे, पनीर, सोयाबीन हेदेखील फायदेशीर ठरेल, असे म्हटले आहे.

    Corona’s central government’s diet plan, including these foods in the diet

    महत्वाच्या  बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…