• Download App
    पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत, ७६ दिवसांनंतरचे चित्र ; रुग्णसंख्याही घटली Corona Update India: For the first time, the death toll is in the thousands, Picture after 76 days; The number of patients also decreased

    Corona Update India : पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत, ७६ दिवसांनंतरचे चित्र ; रुग्णसंख्याही घटली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होतात आहे. तब्बल ७६ दिवसानंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत आला आहे.  Corona Update India: For the first time, the death toll is in the thousands, Picture after 76 days; The number of patients also decreased

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात ४६,१४८ रुग्णांची भर पडली आहे तर ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ७६ दिवसांनंतर पहिल्यांदाच रुग्णांची मृत्यू संख्या ही हजाराच्या आत आली आहे. गेल्या २४ तासांत ५८,७७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी रविवारी, ५०,०४० रुग्णांची भर पडली होती तर ११५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

     

    देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ५,७३,९९४ वर पोचली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३,९६,७३० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी दर हा ९६.८० टक्क्यांवर पोचला आहे.

    लसीकरणात भारत पहिल्या क्रमांकावर

    कोरोना लसीकरणात आता भारताने अमेरिकेलाही मागे टाकून आघाडी घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ३२.३६ कोटी डोस दिले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ३२.३३ कोटी डोस दिले आहेत.

    देशातील आजची कोरोना स्थिती :

    एकूण बाधित : तीन कोटी दोन लाख ७९  हजार ३३१

    कोरोनामुक्त एकूण आकडा : दोन कोटी  ९३ लाख ०९ हजार ६०७

    एकूण सक्रिय रुग्ण :  पाच लाख  ७२ हजार ९९४

    एकूण मृत्यू :  तीन लाख  96 हजार 730

    राज्यातील स्थिती

    राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात रविवारी ९,९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १४२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी ८५६७ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

    रिकव्हरी रेट ९५.५१ टक्क्यावर

    राज्यात आतापर्यंत ५७,९०,११३ जण कोरोनामुक्त झाले आहे. रिकव्हरी रेट ९५.५१ टक्क्यावर गेला आहे. राज्याचा मृत्यूदर २ टक्के आहे. राज्यात सध्या १ लाख २२ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात १५२५ रुग्ण तर धुळ्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.

    Corona Update India: For the first time, the death toll is in the thousands, Picture after 76 days; The number of patients also decreased

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!