वृत्तसंस्था
कराड : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊऩ कोरोना चाचणी करण्यास कराड नगरपालिकेने रविवारी प्रारंभ केला. रविवार व शुक्रवार पेठेत पथकाने कोरोनाची चाचणी केली. काही ठिकाणी विरोध मोडून नगरपालिकेने सक्तीने चाचणी केली आहे. Corona testing at home in Karad
कराड शहरात बाधित व संपर्कात येणारे नागरिक घऱाबाहेर फिरत आहेत. त्यामुळे बाधितांच्या घरी जाऊन त्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर त्यांची घरात जाऊन चाचणी करण्याचा धडाका नगरपालिकेने लावला आहे.
नागरी आरोग्य केंद्राचे पथक रुग्णवाहिकेसह प्रथम बाधित व्यक्तीच्या घरी जाऊन कोरोना चाचणी करत आहे. त्या नंतर कोरोनाबाधितांच्या सहवासात असलेल्यांची चाचणी घरीच जाऊनच करत आहे. नगरपालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घेण्यात आली.
शहरात बाधितांच्या अति सहवासात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. मात्र, त्याला कोणीच जुमानत नसल्याने घरोघरी चाचण्या सुरु केल्या आहेत.
Corona testing at home in Karad
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट, न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर केले व्हायरल
- खुनाच्या आरोपानंतर फरार ऑलिम्पिकपटू पहिलावन सुशील कुमार अटकेत
- चंद्रावर बर्फ आहे? शोधासाठी नासा चंद्रावर उतरवणार साडेसोळाशे कोटी रुपयांचा रोबोट
- पुणे जिल्हा ऍक्टिव्ह रुग्णांचा मोठा हॉटस्पॉट ; शुक्रवार अखेर ५८ हजार ८४० जण आढळले
- अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु