• Download App
    मुलांमध्ये कोरोना वाढला, पुण्या पाठोपाठ कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील 14 मुली कोरोना पॉझिटिव्ह Corona in children, 14 girls from Kolhapur corona positive

    मुलांमध्ये कोरोना वाढला, पुण्या पाठोपाठ कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील 14 मुली कोरोना पॉझिटिव्ह

    लहान मुलांना कोरोना होण्याच्या घटना वाढत असून पुण्या पाठोपाठ कोल्हापुरात 14 मुली कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. येथील बालकल्याण संकुलमधील या मुली आहेत. Corona in children, 14 girls from Kolhapur corona positive


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : लहान मुलांना कोरोना होण्याच्या घटना वाढत असून पुण्या पाठोपाठ कोल्हापुरात 14 मुली कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. येथील बालकल्याण संकुलमधील या मुली आहेत.
    बाधित मुलीना महापालिकेच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कोल्हापुरातील बालकल्याण संकुल मध्ये समाजातील अनाथांचे संगोपन केले जाते. रविवारी 6 ते 18 वयोगतील 14 मुली बाधित झाल्या.

    पाण्याच्या खजिन्या जवळील या संकुलमध्ये एका मुलीला तापाची लक्षणे जाणवत होती, म्हणून तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. लगेच तिच्या संपर्कातील अन्य मुलींची तपासणी केली गेली यात आणखी 13 जणी पॉझिटिव्ह आढळून आल्या. तातडीने त्यांना कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले. संपूर्ण संकुलात औषध फवारणी करण्यात आली. सोमवारी महापालिकेतर्फे मुलांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे.



    बालकल्याण संकुल मध्ये 5 युनिट मध्ये 250 मुले मुली राहतात. त्यात 46 मुली आहेत.  कोरोना झालेल्या या मुलींमध्ये सध्या कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती चांगली आहे.

    बालकल्याण संकुलमध्ये पोक्सो कायद्या अंतर्गत आणलेल्या मुलींनाही ठेवले जाते. त्यांना कोणतीही वेगळी वर्तवणूक देता येत नाही. गेल्या आठवड्यात अशा 10 ते 12 मुली आल्या होत्या.त्यांची कोणतीही टेस्ट ना करताच त्यांना येथे आणले गेले. पॉझिटिव्ह आढळलेल्या 14 जणीमध्ये तब्बल 6 ते 7 जणी अशा बाहेरून आलेल्या आहेत. त्यांच्या मुळेच लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
    पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील सार्थक संकुलातील 19 मुलांना बाधा झाली होती.

    Corona in children, 14 girls from Kolhapur corona positive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…