वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती भयावह बनली आहे. ही लाट अत्यंत प्राणघातक होत आहे. आता केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी बुधवारी देशात तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. Corona 3rd Wave vijay raghwan vaccine upgrade
विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोनाच्या संसर्गाची प्रकरण वाढत आहेत. तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्की येणार आहे. त्यामुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे.
नवीन कोरोनाच्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी लस अपग्रेड करावी लागणार आहे. लस अपग्रेड करण्याबरोबरच सर्व्हिलान्सचीही गरज असेल, असं विजय राघवन यांनी म्हटलं.
विजय राघवन म्हणाले की, 18 ते 44 व वयोगटातील 6 लाख 71 हजार लोकांना लसीचे डोस दिले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशसह 12 राज्यात एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
corona 3rd Wave vijay raghwan vaccine upgrade
बातम्या
- Post Corona Effects : कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर सुद्धा हृदयरोगाचा धोका , तपासणी करुन घ्या ; तज्ञांचा मौलिक सल्ला
- श्रीमंत मराठ्यांना हवेत उंबरठे झिजवणारे गरीब लाचार मराठे -प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- मराठा आरक्षणावरून उध्दव ठाकरेंचे राजकारण : केंद्राने निर्णय घ्यावा म्हणताना पंतप्रधानांना संभाजीराजेंच्या भेटीवरून दूषण
- घटनेनुसार ५० टक्केंपेक्षा जास्त आरक्षण शक्यच नाही, घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांचे मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयावर रोखठोक मत