माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून 4 हजार जण कोट्यधीश, त्यांचं वाटोळं होईल, दिव्यांग मुलं जन्माला येतील : इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य
आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे.
विशेष प्रतिनिधी
अकोला: आपल्या अनोख्या किर्तन शैलीच्या आधारे नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज .वादग्रस्त वक्तव्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत .आता परत एकदा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे . अकोला येथील एका किर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं.Controversial statement of Indurikar Maharaj in NCP program …
कीर्तनाच्या व्हिडीओ क्लीप तयार करुन यूट्यूबवर (YouTube) अपलोड करणाऱ्या तरुणांवर इंदुरीकरांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
“माझ्या जीवावर 4 हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल” असं म्हणत दिव्यांग शब्दाकडे निर्देश करणारे हातवारे इंदुरीकरांनी केले.
आज याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही. असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सोमवारी रात्री अकोला शहरातील कौलखेड भागात त्यांचं कीर्तन झालं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं.