बहुतांश सर्वांनाच मेंदूबाबत जुजबी माहिती असते. त्यात मेंदूचे दोन विभाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू हे सर्वांना माहिती असते. पण त्याचे काम कसे चालते हे अनेकदा लक्षात येत नाही.Continuous revision of the left brain
शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात अधिक भर डाव्या मेंदूवर दिला जातो. डावा मेंदू हा भाषा, गणित, व्यवहार, संशोधन आणि अचूकपणासाठी जवाबदार असतो त्या उलट उजवा मेंदू सृजनशिलता, कल्पकता, भावना, नेटकेपणा आणि विविध कलांशी निगडीत असतो.
दोन्ही भागांच्या मेंदूचे कार्य विरुध्द परंतु परस्परपूरक आहे. डावा मेंदू माहिती हळूहळू आणि सातत्याने उजळणी घेत राहतो. तर उजवा मेंदू ही माहिती काही क्षणात घेतो व त्याला सातत्याची आवश्यकता नसते.
जेव्हा गरज पडेल तेव्हा उजव्या मेंदूला ही माहिती काही सेकंदात आठवते ह्याला फोटोग्राफीक मेमरी म्हणतात. जपानचे संशोधक सिशीदिया मॅकातो ह्यांचा त्यावर गाढा अभ्यास होता व त्यांनी जपानमध्ये प्रिस्कूलर्ससाठी अश्या ३५० संस्था काढल्या आहे. ह्याच अर्थ सहा वर्षाच्या आधी आपण उजव्या मेंदूची वाढ होण्यासाठी प्रयत्न करु शकतो म्हणजेच मल्टीपल इन्टलिजन्स आपल्या मुलामध्ये जागवू शकतो.
संशोधनात असे सिध्द झाले आहे की अपूरा आणि निकृष्ट आहार, विशिष्ट इन्फेक्शन किंवा औषधे, प्रदुषित वातावरण आणि जास्तीचा स्ट्रेस हा मेंदूच्या वाढीत अडथळे निर्माण करतो. मेंदूच्या वाढीसाठी चारवेळा सकस आणि पौष्टीक आहार, योग्य प्रमाणात पाणी आणि कमीतकमी ताणतणाव हे सर्व आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकाने याची काळजी घ्यायला पाहिजे.
कारण मेंदू आपल्याला दिसत नसतो. तो दिसत नसला तरी तोच खऱ्या अर्थाने साऱ्या शरीराचे सुकाणू सांभाळत असतो याचे भान सतत ठेवायला पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यासाठी त्याची सतत व चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. त्याला बाहेरून कोणतीही इजा होणार नाही याची जशी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच आतूनही त्याचे योग्य पोषण होईल याची दक्षता घेतली पाहिजे.