• Download App
    HDFC Banck : ग्राहकांना अडचणी येऊ शकतात, आज आणि उद्या 'या' सुविधा 18 तास राहतील बंद , जाणून घ्या सविस्तर तपशील Consumers may face difficulties, 'this' facility will remain closed for 18 hours today and tomorrow.

    HDFC Banck : एचडीएफसी ग्राहकांसाठी अलर्ट, आज आणि उद्या 18 तास बँकेच्या ‘या’ सुविधा राहतील बंद, वाचा सविस्तर

    HDFC Banck : बँकेने ग्राहकांना ई-मेल द्वारे कळवले आहे की नियोजित देखभालीमुळे कर्ज संबंधित सुविधा आज रात्री 9 ते उद्या दुपारी 3 पर्यंत उपलब्ध होणार नाहीत. Consumers may face difficulties, ‘this’ facility will remain closed for 18 hours today and tomorrow.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. ग्राहकांना आज आणि उद्या बँकेच्या कामांसंबधित काही समस्या येऊ शकतात. बँकेने ग्राहकांना ई-मेल द्वारे कळवले आहे की, नियोजित मेंटेनन्सच्या कामामुळे बँकेच्या कर्जाशी संबंधित सुविधा आज रात्री 9 ते उद्या दुपारी 3 पर्यंत उपलब्ध होणार नाहीत.

    बँकेने दिली ही माहिती

    बँकेने म्हटले आहे की, 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 ते 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत ग्राहकांना नेटबँकिंगवर कर्ज संबंधित सुविधा मिळणार नाहीत. या सुविधा 18 तास बंद राहतील. यादरम्यान बँकेकडून डिजिटल बँकिंग सुविधा आणखी सुधारण्यासाठी काम होणार आहे.

    ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.  त्याच वेळी, त्यांनी या कामात ग्राहकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



    एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना समस्यांना सामोरे जाण्याची ही पहिली वेळ नाही. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना यापूर्वीही अनेकदा अशाच समस्येचा सामना करावा लागला आहे. एचडीएफसी बँक ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक आहे.

    नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी

    या महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एचडीएफसी बँकेला मोठा दिलासा दिला असल्याची माहिती आहे. आठ महिन्यांच्या बंदीनंतर केंद्रीय बँकेने HDFC ला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे.

    एचडीएफसी बँकेत वारंवार होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे आरबीआयने ही कारवाई केली होती. यासह कोणतीही नवीन डिजिटल उपक्रम सुरू करण्यासही बंदी घालण्यात आली होती, जी पुढेही सुरू राहील.

    बँकेने सुधारित केली प्रणाली

    बंदी लागू केल्यापासून एचडीएफसी बँक आरबीआयच्या सतत संपर्कात आहे आणि सूचनांनुसार आपली प्रणालीदेखील सुधारित केली आहे. अलीकडेच, बँकेचे ग्राहक वित्त डिजिटल बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख पराग राव म्हणाले की, आम्ही कार्ड व्यवसायाबद्दल आत्मपरीक्षण केले असून नवकल्पना राबवण्यासाठी या बंदीच्या काळाचा वापर केला. आमच्याकडे 15 कोटींहून जास्त ग्राहक आहेत.

    Consumers may face difficulties, ‘this’ facility will remain closed for 18 hours today and tomorrow.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…