- शरद पवार यांनी काँग्रेसची आत्ताची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी आहे असं म्हटलं होतं.
- आता यावर स्मृति इराणी यांनी मजेदार ट्विट करत चांगलीच फिरकी घेतली आहे .CONGRESS VS NCP: Congress was, not now – ‘Congress’ like that ‘landlord’: Smriti Irani took a spin on Sharad Pawar’s statement ….
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :शरद पवारांनी सत्तेत मित्रपक्ष असणार्या कॉंग्रेसवर सणसणीत टिप्पणी केली त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.असा कॉंग्रेसचा उल्लेेख त््यांनी केला .शरद पवारांनी केलेल्या विधानावर देशभरात चर्चा सुरू असून, प्रतिक्रियाही उमटत आहेत. भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शरद पवारांच्या विधानावर ट्वीट करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.CONGRESS VS NCP: Congress was, not now – ‘Congress’ like that ‘landlord’: Smriti Irani took a spin on Sharad Pawar’s statement ….
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारण आणि काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करत आत्मचिंतनाची गरज असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचवलं. शरद पवार यांनी केलेल्या भाष्यानंतर काँग्रेसबरोबरच भाजपतूनही प्रतिक्रिया उमटल्या आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी ट्वीट केलं आहे.
शरद पवार यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ रिट्वीट करत स्मृती इराणी यांनी शरद पवार आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. ‘काँग्रेस राजकीय जमीनदारासारखा… असं आम्ही नाही, तर शरद पवार म्हणत आहेत’, असं म्हणत स्मृती इराणी यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
‘शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा काँग्रेसचं वर्णन वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरु आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबांनी केलं आहे आणि ते काँग्रेसला चपखल लागू पडतं’, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला लगावला होता.