• Download App
    Congress Vs Congress :काँग्रेसनेच केली चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सीबीआय चौकशीची मागणी थेट अमित शहांकडे ! शाहांनी केली मान्य;काय आहे प्रकरण? वाचा...Congress Vs Congress: Congress demands CBI probe into Chandrapur District Central Bank directly to Amit Shah! Shah agreed; what is the matter? Read ...

    Congress Vs Congress :काँग्रेसनेच केली चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सीबीआय चौकशीची मागणी थेट अमित शहांकडे ! शाहांनी केली मान्य ; काय आहे प्रकरण? वाचा…

    चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली .

    धानोरकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहांकडे ही मागणी केली .   Congress Vs Congress: Congress demands CBI probe into Chandrapur District Central Bank directly to Amit Shah! Shah agreed; what is the matter? Read …


    विशेष प्रतिनिधी

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं गैरव्यवहाराचं प्रकरण सध्या गाजतयं. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी सीबीआय चौकशी करण्याची मागणी लोकसभेत केली होती. आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही विधानसभेत गैरव्यवहाराचा प्रकरणाकडे लक्ष वेधलं. धानोरकरांनी या प्रकरणी सहकार मंत्री अमित शहांची भेट घेतली. या वीगैरव्यवहाराच्या चौकशीचं आश्वासन अमित शहांनी त्यांना दिलं आहे.Congress Vs Congress: Congress demands CBI probe into Chandrapur District Central Bank directly to Amit Shah! Shah agreed; what is the matter? Read …

    राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे. या आधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले आहेत. बॅंकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बॅंकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देवून या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.

    पदभरती घोटाळा व सतत सुरू असलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनियमितता यावर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहरात १३ मार्च ला प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नाबाबत व बँकेत सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराबाबत गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांची खासदार धानोरकर यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत धानोरकर यांना शहांनी चौकशीचं आश्वासन दिलं. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस समर्पित संचालकांचे वर्चस्व आहे. असे असताना धानोरकरांनी केलेल्या मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

      पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्यात शितयुद्ध सुरू असल्याचे बोलले जात आहे. बँकेचा चौकशीची मागणी या शितयुद्धातूनच आल्याचे बोलले जात आहे.

    धानोरकरांनी सीबीआय चौकशीची मागणी करण्याला वडेट्टीवार-धानोरकर वादाची पार्श्वभूमी आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्यात आले होते. त्यावेळीही धानोरकर-वडेट्टीवारांनी एकमेकांची उणीदूणी काढली होती.

    Congress Vs Congress: Congress demands CBI probe into Chandrapur District Central Bank directly to Amit Shah! Shah agreed; what is the matter? Read …

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस