नाशिक : केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलवण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस – राष्ट्रवादीत संघर्ष!!, असे एकमेकांशी विसंगत राजकीय चित्र आज समोर आले.Congress ready to invite INDI alliance meeting, but rift in congress – NCP SP in Maharashtra
INDI आघाडीची लवकरच बैठक बोलावली पाहिजे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी संजय राऊत यांना फोन केला. बैठकीसाठी अनुकूलता दाखवली. त्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा लवकरच जाहीर करू, असे सांगितले. मराठी माध्यमांनी या बातम्या देऊन उद्धव ठाकरेंचे दिल्लीत राजकीय वजन वाढल्याची मखलाशी केली. उद्धव ठाकरेंनी फक्त इंडिया आघाडीची बैठक घ्या, एवढीच मागणी केली, ती काँग्रेसने मान्य केली म्हणून लगेच उद्धव ठाकरेंचे राजकीय वजन दिल्लीत वाढल्याचे ढोल यातून पिटण्यात आले.
महाराष्ट्रात विसंगत चित्र
पण त्याच्या उलट चित्र महाराष्ट्रात दिसले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केले. महाराष्ट्रात दोन बैलांच्या गाडीचे कासरे आणि तुतारी एकाच्या हातात आहे. त्याच्याकडेच सगळे सरकार चालवायचे अधिकार आहेत. मी दोन बैल कोण हे सांगत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी सरकार चालवण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरताना तुतारीचा उल्लेख करून शरद पवारांना देखील टोचले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अडचणीत आले. आमदार रोहित पवारांनी त्यावरून खुलासा करायचा प्रयत्न केला. वडेट्टीवार यांना तुतारी म्हणायचे नसेल. घड्याळ म्हणायचे असेल तुम्ही त्यांना परत त्यावरून काही प्रश्न विचारला तर तेच म्हणतील, मला तुतारी म्हणायचे नव्हते, घड्याळ म्हणायचे होते, असे तेच सांगतील. कारण आम्ही रोज त्यांच्या शेजारी विधानसभेत बसतो सरकारवर टीका करतो हे त्यांना माहिती आहे, असे रोहित पवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांनी फक्त “तुतारी” या शब्दाचा उल्लेख केल्यावर रोहित पवारांना भला मोठा खुलासा करावा लागला. यातूनच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) या दोन घटक पक्षांमधली राजकीय विसंगती समोर आली.
उद्धव ठाकरेंनी फक्त INDI आघाडीची बैठक बोलवा एवढीच मागणी केली, ती काँग्रेसने मान्य केल्याबरोबर दिल्लीत ठाकरेंचे राजकीय वजन वाढल्याची मखलाशी मराठी माध्यमांनी केली, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातली राजकीय विसंगती मात्र समोर आणली नाही. विजय वडेट्टीवार यांनी “तुतारी” या शब्दाचा स्पष्ट उल्लेख करून फडणवीस सरकारला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडपणे सांगितले, रोहित पवारांना त्यावरून मोठा खुलासा करावा लागला, पण या विषयावरून मराठी माध्यमांनी कुठली मखलाशी केली नाही.
Congress ready to invite INDI alliance meeting, but rift in congress – NCP SP in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न
- विधान भवनात फोटोसेशनच्या वेळी ठाकरे-शिंदे आमनेसामने; एकमेकांना पाहणेही टाळले
- Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती
- लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!