• Download App
    राम मंदिर जमीन खरेदी कथित घोटाळा; दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये जुंपल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीही टीकेची झोड उठवायला पुढे सरसावले Congress leader PC Sharma lodges a complaint with Bhopal Police for investigation into alleged irregularities in land purchase by Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra in Ayodhya

    राम मंदिर जमीन खरेदी कथित घोटाळा; दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये जुंपल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीही टीकेची झोड उठवायला पुढे सरसावले

    प्रतिनिधी

    मुंबई – अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदीत कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोपावरून भाजप – शिवसेनेत भांडण जुंपल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष देखील त्यावर टीकेची झोड उठवायला पुढे सरसावले आहेत. Congress leader PC Sharma lodges a complaint with Bhopal Police for investigation into alleged irregularities in land purchase by Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra in Ayodhya

    राम मंदिरासाठी जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी केला. त्यावर शिवसेनेने सामनात अग्रलेख लिहून भाजपला डिवचले. भाजपने आम आदमी पार्टीच्या संजय सिंग यांच्या विरोधात आंदोलन न करता शिवसेनेविरोधात आंदोलन केले. शिवसेना भवनासमोर काल भाजप – शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

    त्यावर सामनाचे कार्यकरी संपादक संजय राऊतांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवप्रसाद दिल्याची मखलाशी केली. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. राममंदिर हा विषय भाजपा, विश्व हिंदू परिषद किंवा ट्रस्टचा नाही. तर राममंदिर हा विषय समस्त हिंदूंचा आहे. हिंदूंच्या विषयावर व्यक्त व्हावे असे आम्हाला वाटते आणि तुम्हाला व्यक्त झालं नाही पाहिजे वाटतं. जिथे हिंदुत्व सोडले तिथेच तर अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली ना. तुम्ही आमच्यावर टिप्पणी करणार, तुमचं हिंदुत्व खोटारडं अस म्हणणार, अशी टीका चंद्रकांतदादांनी केली.

    आता शिवसेना – भाजपची जुंपली हे पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा तापवायला सुरूवात केली आहे.

    काँग्रेसने आक्रमक होत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. काँग्रेसचे मध्य प्रदेशातील नेते पी. सी. शर्मा यांनी राम जन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्ट विरोधात कलम ४०८, कलम ४२० आणि कलम १२० बी नुसार एफआयआर दाखल करण्याची मागणी भोपाळमध्ये पोलीस ठाण्यात केली आहे.

    तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही? हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी.”, असे आवाहन केले आहे. त्यांनी या निमित्ताने भाजप – विश्व हिंदू परिषदेवर टीकेची झोड उठवून घेतली आहे.

    Congress leader PC Sharma lodges a complaint with Bhopal Police for investigation into alleged irregularities in land purchase by Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra in Ayodhya

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य