- पीपीई किटची निर्यात, कोरोना महामारीला सर्व क्षेत्रांनी एकत्र येऊन सरकारच्या प्रयत्नांतून यशस्वी तोंड दिले’
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोविड महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था घसरली असताना सरकार, उद्योग क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून आपण पीपीई कीटसारख्या वस्तूंचे उत्पादन निर्यात क्षमतेपर्यंत आणून ठेवले ही निश्चितच कौतूकास्पद आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या प्रयत्नांची स्तुती केली. फिक्की या औद्योगिक संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. congress leader anand sharma praise modi govt over covid issue
कोरोना महामारीचे संकट सगळ्या जगापुढे अचानक उभे राहिले. त्याला भारताने सरकार, उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र आणि एक लोकशाही व्यवस्था म्हणून ज्या प्रकारे तोंड दिले, त्यासाठी ही क्षेत्रे, त्यातील व्यक्ती नक्कीच प्रशंसेला पात्र आहेत, असे आनंद शर्मा म्हणाले.
या संकटकाळात आपण भारतीय एक देश म्हणून एकजुटीने उभे राहिलो आणि त्याला यशस्वीरित्या तोंड दिले आणि यापुढेही असेच एकजुटीने राहून हे संकट दूर करू, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.
congress leader anand sharma praise modi govt over covid issue
फिक्कीच्या बैठकीत आनंद शर्मांनी मोदी सरकारच्या प्रयत्नांची स्तुती केली आहे. त्याआधीही परराष्ट्र धोरणावरून शर्मांनी मोदी सरकारची प्रशंसा केली आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनेबद्दल आणि नेतृत्वाबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्येही आनंद शर्मांचा समावेश होता.