महाविकास आघाडीसमोरील अडचणी आणखी वाढणार असून कॉंग्रेसमधील नव्या पाटीलकीने आता सत्तेतील वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेसचे नवे प्रभारी शासकीय महामंडळे, मंडळे आणि समित्यांवरील राजकीय नियुक्त्यांसाठी आक्रमक झाले आहेत. congress latest news
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीसमोरील अडचणी आणखी वाढणार असून कॉँग्रेसमधील नव्या पाटीलकीने आता सत्तेतील वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेसचे नवे प्रभारी शासकीय महामंडळे, मंडळे आणि समित्यांवरील राजकीय नियुक्त्यांसाठी आक्रमक झाले आहेत. congress latest news
महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन सरकार बनविल्यानंतरही कॉंग्रेसच्या हातात फारसे काही मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. शासकीय महामंडळे, मंडळे आणि समित्यांवरील राजकीय नियुक्त्या म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांसाठी चराऊ कुरणेच असतात. त्यामुळे कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे नवे प्रभारी एच. के. पाटील यांनी या नियुक्त्यांची मागणी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. आता शासकीय महामंडळे, मंडळे, समित्यांवरील राजकीय नियुक्त्या लवकर झाल्या पाहिजेत, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला घाई नसेल तर काँग्रेसचा कोटा निश्चित करून द्यावा, त्यानुसार आमच्या नियुक्त्या केल्या जातील, असे एच.के . पाटील यांनी सांगितले.
congress latest news
राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवरील नियुक्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीत एका काँग्रेस नेत्याच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या उमेदवाराची राष्ट्रवादी काँग्रेसने शिफारस केली आहे. याबाबत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारमधील तीनही पक्षांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.