• Download App
    CONFUSION! Vadettivar's unlock announcement 'locked' by CM! Confusion re-emerges in government

    CONFUSION ! वडेट्टीवारांची अनलॉकची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून ‘लॉक’! सरकारमधील सावळागोंधळ पुन्हा उघड

    • राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन.CONFUSION! Vadettivar’s unlock announcement ‘locked’ by CM! Confusion re-emerges in government

     

    मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून हळूहळू पाच लेव्हलच्या वर्गवारीनुसार विविध जिल्ह्यांतील लॉकडाउन उठवला जाईल, अशी घोषणा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. या घोषणेला काही तासही झाले नसताना, राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे कळवण्यात येतील, अशी माहिती राज्य शासनाकडून DGIPR देण्यात आली आहे.CONFUSION! Vadettivar’s unlock announcement ‘locked’ by CM! Confusion re-emerges in government

     

     

    कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत.

    राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

    अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

    CONFUSION! Vadettivar’s unlock announcement ‘locked’ by CM! Confusion re-emerges in government

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस