नाशिक : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र या मुद्द्यावरून संघाच्या प्रतिक्रियेवर वेगळाच narrative set करायचा प्रयत्न मराठी माध्यमांनी चालविल्याचे आज समोर आले.Compulsory Hindi and three language formula different and false narrative setting from RSS reaction
महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवायचा निर्णय घेतला. मात्र हिंदीची सक्ती केली, असा दावा करत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. फडणवीस सरकारने तो अध्यादेश मागे घेतला. त्यामुळे आपला विजय झाल्याचा दावा करून ठाकरे बंधूंनी ऐक्य मेळावा घेतला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला. त्यावरून हिंदी सक्ती आणि राज्यांच्या भाषांवरचे प्रेम या विषयावर वेगळेच राजकारण सुरू झाले.
याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांची अखिल भारतीय बैठक झाली. या बैठकीनंतर त्यातल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुनील आंबेकर यांना महाराष्ट्रातल्या हिंदी सक्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी संघाची पहिल्यापासूनची भूमिका स्पष्ट केली. भारतातल्या सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. लोक आपापल्या प्रांतांमध्ये आपापल्या भाषा बोलतात. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यावे, ही संघाची पहिल्यापासूनच भूमिका आहे, असे ते म्हणाले. या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी कुठेही फडणवीस सरकारला फटकारले वगैरे काही नव्हते. त्याचबरोबर फडणवीस सरकारच्या अध्यादेशात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा विषय होता. हिंदी माध्यमामध्ये शिक्षण घेण्याचा विषय नव्हताच.
मात्र, सुनील आंबेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्यांनी फडणवीस सरकारवर ताशेरे झोडल्याच्या थाटात मराठी माध्यमांनी बातम्या चालविल्या. संजय राऊत यांनी सुनील आंबेकर यांच्या वक्तव्याचे ट्विट करून फडणवीस सरकारला घेरले. संजय राऊत यांच्या बातम्या देखील मराठी माध्यमांनी जोरात चालविल्या.
परंतु, या सगळ्यांमध्ये मूळात फडणवीस सरकारने हिंदी माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा अध्यादेश काढलाच नव्हता. तो फक्त पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा अध्यादेश काढला होता. सरकारने तो नंतर मागे घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे राजकारण घडले. त्यावर संघाच्या प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामध्ये फडणवीस सरकारवर ताशेरे वगैरे काही ओढले नव्हते, पण मराठी माध्यमांनी मात्र संघाने फडणवीस सरकारवर ताशेरे अशा बातम्या चालवून खोटे narrative setting करायचा प्रयत्न केला.
Compulsory Hindi and three language formula different and false narrative setting from RSS reaction
महत्वाच्या बातम्या
- PM Modi जी BRICS ट्रम्प मोडायला सांगत होते, त्याच BRICS मधून मोदींनी महासत्तांना सुनावले…
- Sri Lanka : श्रीलंकेने म्हटले- कोणत्याही किंमतीत कच्चाथीवू बेट सोडणार नाही; कायदेशीररीत्या ते आमचे
- पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न
- Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार