• Download App
    मुलायम - अखिलेश यांच्या इटावात जाऊन योगींनी ललकारले; बबुवा, यह ट्विटरही आकर आपको वोट देगा!! come here twice during Corona. But people of other parties were in home isolation, at home when you were in a crisis

    मुलायम – अखिलेश यांच्या इटावात जाऊन योगींनी ललकारले; बबुवा, यह ट्विटरही आकर आपको वोट देगा!!

    वृत्तसंस्था

    इटावा : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे प्रमुख राजकीय नेत्यांचे कार्यक्रम वाढत चालले आहेत. हे नेते एकमेकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत. come here twice during Corona. But people of other parties were in home isolation, at home when you were in a crisis

    गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला गोरखपूर येथे जाऊन योगींना आव्हान दिले, तर आज योगी आदित्यनाथ यांनी मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या इटावा गावात जाऊन समाजवादी पार्टीला आव्हान दिले.

    योगी आदित्यनाथ यांनी इटावा येथे जिल्हा कारागृहाचे उद्घाटन केले. त्यानंतर केलेल्या भाषणात योगींनी अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की कोरोना काळात मी इटावा मध्ये दोनदा आलो आहे. या इटाव्याचे काही लोक कोरोना प्रतिबंधक लसीला विरोध करत होते. पण इटावा येथील जनतेने लसीकरणात शंभर टक्के प्रतिसाद देऊन त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना काळात हे लोक घरी बसले होते. आता इटावाची जनता त्यांना सांगेल बबुवा यह ट्विटरही आकर आपको देखा वोट देगा!!

    इटावा हा जिल्हा मुलायम सिंग यादव यांचा जन्म जिल्हा आहे. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. परंतु 2014 नंतर इथली राजकीय परिस्थिती बदलून दोन वेळा भाजप खासदार इथून विजयी झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी भाऊबिजेचा मुहूर्त साधून इटावा जिल्हा कारागृहचे उद्घाटन केले. याचा शिलान्यास देखील त्यांनी केला होता. या मुद्द्यावरून देखील त्यांनी अखिलेश यादव यांना छेडले. आम्ही शिलान्यासही करतो आणि उद्घाटनही करतो. काही लोक नुसते शिलान्यास करून निघून जातात.

    अयोध्येमध्ये पूर्वी लोक जायला घाबरत होते. ज्यांनी गोळीबार केला ते आता पुढच्या कारसेवेला रांगेत उभे राहिलेले दिसतील. अयोध्येत दीपोत्सवाचा जागतिक विक्रम घडल्याचे त्यांनी पाहिले आहे. इटावा गावाची जनता त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन पुन्हा एकदा घरी बसवेल, असा टोला देखील योगी आदित्यनाथ यांनी लगावला

    come here twice during Corona. But people of other parties were in home isolation, at home when you were in a crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…