• Download App
    महाविद्यालये 15 सप्टेंबरपासून सुरू होणार, आज होणार शुल्क कपातीवर चर्चा ; सामंत Colleges will start from September 15, Today's discussion on fee reduction: Samant

    महाविद्यालये १५ सप्टेंबरपासून सुरू होणार, आज होणार शुल्क कपातीवर चर्चा ; सामंत

    वृत्तसंस्था

    पुणे : महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.१५ सप्टेंबरपासून सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. Colleges will start from September 15, Today’s discussion on fee reduction: Samant

    पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सामंत बोलत होते. कोरोना संकटकाळात नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात कपात करून विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर विद्यापीठांनीदेखील शुल्ककपातीचा निर्णय घ्यावा, यासाठी आज सोमवारी कुलगुरूंसोबत बैठक घेऊन शुल्ककपातीचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच दोन दिवसांत मंत्रालय स्तरावरून विद्यापीठांना पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी ग्वाहीही सामंत यांनी दिली.

    प्राध्यापक भरतीचे आश्वासन

    कोरोनामुळे प्राध्यापक भरती थांबली होती. ती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पहिला टप्पा म्हणून ३ हजार ७४ रिक्त जागेची भरती पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येईल. तसेच १२१ जागांवर ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील ६५९ जागांवर शिक्षकीय भरतीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सामंत म्हणाले.

    Colleges will start from September 15, Today’s discussion on fee reduction: Samant

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!