• Download App
    काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात! मुख्यमंत्री कानात बोलले-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले तर मी भाजपला फोन करतो!दानवेंचा गौप्यस्फोटCM speaks in ear: If Congress and NCP people start harassing me, I will call BJP!

    काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात! मुख्यमंत्री कानात बोलले-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले तर मी भाजपला फोन करतो!दानवेंचा गौप्यस्फोट

    शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष असल्याने कधीही एकत्र येऊ शकतात’.CM speaks in ear: If Congress and NCP people start harassing me, I will call BJP!


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरुन आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. दोन वर्षांनी शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा युतीची चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या चर्चेला खतपाणी घातलं.मंचावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे बराच वेळ बोलत असल्याचे दिसून आले त्यानंतर पत्रकारांनी यावर प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले – मुख्यमंत्री आपल्याला कानात बोलले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले तर मी भाजपवाल्यांना फोन करतो . या एकदा आपण बोलू असं मुख्यमंत्री बोलल्याचा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे.CM speaks in ear: If Congress and NCP people start harassing me, I will call BJP!

    शिवसेना आणि भाजप समविचारी पक्ष

    औरंगाबादमध्ये (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) व्यासपीठावर एकमेकांशी बोलताना दिसले. याबाबत रावसाहेब दानवे यांना विचारलं असता त्यांनी सूचक विधान केलं.

    शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष असल्याने कधीही एकत्र येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना जो अनुभव आला असेल, त्या अनुभवामुळे मुख्यमंत्री बोलले असतील, की रावसाहेब भविष्यात आपण एकत्र येऊ शकतो. शिवसेनेची एकत्र येण्याची इच्छा असेल तर भाजप कधीही या विचाराशी सहमत राहणार आहे. मुख्यमंत्री आपल्याला कानात बोलले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले, तर मी भाजपवाल्यांना फोन करतो, या एकदा आपण आणि बोलू असं मुख्यमंत्री बोलल्याचा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. आम्ही पुन्हा मित्र होऊ शकतो, हे आम्ही नाकारत नाही, असंही दानवे यांनी सांगितलं.

    बाळासाहेब थोरात उपस्थित होते

    मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आपल्याला एकत्र येण्याविषयी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्ट होतंय की तिकडे फार काही आलबेल चाललेलं नाही असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. राज्यातील मतदारांना अजूही वाटतंय की शिवसेनेने इकडे यावं, जे मतदारांचं मत आहे, तेच आमचं मत आहे, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

    CM speaks in ear: If Congress and NCP people start harassing me, I will call BJP!

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले