कोरोना व्हायरस आणि वुहान कनेक्शन बद्दल आणखी एक धक्कादायक माहिती.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: चीनने कोरोना व्हायरसवरून वेळोवेळी चालाकी केल्याचं उघड झालं आहे. चीननं कोरोनाचे रुग्ण सापडल्याचा डेटा लपवून ठेवला होता असा आरोप जगभरात होत असताना चीननं मात्र ते सर्व आरोप फेटाळून लावले होते. आता तर चीनच्या चालाकीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. वुहानमध्ये सुरुवातीला आढळलेल्या कोरोना रुग्णांचा डेटा चीननं गायब केला मात्र अमेरिकेने हा डेटा शोधून काढला आहे .China’s cunning: exposing China once again; Corona’s missing data discovered by US
चीनने वुहानमध्ये सापडलेल्या पहिल्या काही कोरोना केसेसचा डेटा गायब केला होता. या डेटाचा काही भाग पुन्हा शोधून काढण्यात अमेरिकेची यंत्रणा यशस्वी ठरली आहे. ही नवीन अपडेट जगासमोर आल्यानंतर आता चीनच्या वुहानमधूनच कोरोना आला आणि तो जाणीवपूर्वक चीननं लपवला हे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेचा रिसर्चर जेसी ब्लूम याने केलेल्या दाव्यानुसार चीननं 241 कोरोनाग्रस्त रुग्णांचा डेटा रहस्यमय पद्धतीनं गायब केला होता. त्यापैकी 13 कोरोनाग्रस्तांचा डेटा शोधून काढण्यात यश मिळालं आहे.
जेसी ब्लूम अमेरिकेतील फ्रेड हचिन्सन कर्करोग संशोधन केंद्रातील व्हायरस तज्ज्ञ आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली. ज्यामध्ये वुहानच्या सुरुवातीच्या 241 प्रकरणांचा जिनोम सिक्वेन्स डेटा हटविण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
ब्लूम यांनी म्हटलं आहे की, जिनोम सिक्वेन्स डिलीट केल्याने शंका निर्माण होते. कोरोना व्हायरसचे मूळ कोठून आलं हे शोधण्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याठी हा प्रकार करण्यात येऊ शकतो अशीही शक्यता ब्लूम यांनी उपस्थित केली.
चीनच्या संशोधकांनी डेटा अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांनी दुसऱ्या ठिकाणी डेटा अपडेट केला. तर पुढे समस्या येऊ नयेत म्हणून पहिला डेटा रहस्यमय पद्धतीनं गायब करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
China’s cunning: exposing China once again; Corona’s missing data discovered by US