Thursday, 8 May 2025
  • Download App
    गोग्रा मधून चीनने सैन्य मागे घेतले; भारताचे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, त्यात ढिलाई नाही China withdrew its soldiers from Gogra in ladakh

    गोग्रा मधून चीनने सैन्य मागे घेतले; भारताचे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, त्यात ढिलाई नाही

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर फॉरवर्ड पोस्टवरून दोन्ही बाजूंचे सैन्य मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू असून चर्चेच्या बाराव्या फेरीनंतर चीनने गोग्रा मधून सैन्य मागे घेण्यात सुरुवात केली आहे. भारताने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे भारतीय सैन्य दलाने स्पष्ट केले आहे. China withdrew its soldiers from Gogra in ladakh

    चीन आणि भारतीय सैन्याने काही ठिकाणांहून माघार घेतलेली आहे. पण त्याच वेळी चीनने लडाखमध्ये आपली सैन्य कारवाई वाढलेली दिसली आहे. चिनी सैन्याने लडाखमध्ये तळावर काही विमाने तैनात केली असून अनेक ठिकाणी ड्रोन द्वारे हालचाली वाढविण्याचे ही भारतीय सैन्यदलाच्या लक्षात आले आहे.

    भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी याची दखल घेऊन चीनबरोबरच्या वाटाघाटींमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी सूचना भारतीय बाजूचे अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार भारतीय बाजूचे अधिकाऱ्यांनी चर्चेच्या आधीच्या दोन फेऱ्यांमध्ये या मुद्याकडे चीनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. वादग्रस्त भागातील सैन्य मागे घेण्याबरोबरच लडाख मधील सैन्य कारवाया स्थगित करण्याची कबुली चिनी अधिकार्‍यांनी दिली दिली आहे, असे भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. तरी देखील भारतीय सैन्य सावधगिरीच्या बाबतीत अजिबात भिलाई करणार नाही हे देखील प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.



    भारताच्या तीनही सैन्यदलांचा प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गेल्याच आठवड्यात लडाख मधील भारतीय बाजूच्या काही फॉरवर्ड पोस्टला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी देखील वाटाघाटी करणाऱ्या भारतीय बाजूच्या अधिकाऱ्यांची व्यापक चर्चा करून त्यांना विशिष्ट मुद्दे चिनी अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे उपस्थित करण्यास सांगितले होते. या वाटाघाटींचा परिणाम म्हणून गोग्रा मधून चिनी सैन्य माघारी जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

    China withdrew its soldiers from Gogra in ladakh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??