महाराष्ट्राचे महापिता स्वराजसंकल्पक शहाजीराजे यांच्या कर्नाटकातील समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे.
नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
एकनाथजी शिंदे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी video कॉलद्वारे साधला संवाद ! स्मारकाचे काम पूर्ण करण्याची दिली ग्वाही.
विशेष प्रतिनिधी
बेळगाव : कर्नाटकातील होदिगेरे ता.चेन्नागिरी, जि.दावणगेरे येथील श्री शहाजीराजे स्मारक निधी ट्रस्टला डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून ५ लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.महाराष्ट्राचे महापिता आणि स्वराजसंकल्पक शहाजीराजे यांची कर्नाटकस्थित समाधी उघड्यावर असल्याची गंभीर बाब इतिहास संशोधक आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांनी सोशल मीडियावरून निदर्शनास आणून दिली होती. ही बाब The Focus India च्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचली . याची तत्काळ दाखल घेत राज्याचे नागरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीकार विश्वास पाटील यांच्याशी आणि श्री शहाजीराजे समाधी स्मारक ट्रस्टशी संपर्क साधत या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची इचछा व्यक्त केली.CHATRAPATI SHAHAJI RAJE: Finally restoration of Raje’s Samadhi! Vishwas Patils post and ‘The Focus India’ Impact ; Immediate donation of Rs 5 lakh by Eknnath Shinde
गेली साडेतीनशे वर्ष होदिगेरे परिसरात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी उघड्यावर आहे. स्वराज्य संकल्पकाच्या या समाधीसाठी छत्र उभा रहावे, परिसराचा विकास व्हावा, यासाठी तात्काळ डॉक्टर श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन कड़ून पहिल्या टप्पात पाच लाख रुपयांचा धनादेश श्री शहाजी राजे स्मारक विकास समितीकडे सुपूर्द केला.
श्री शहाजी राजे यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली गेल्याने स्थानिकांसह महाराष्ट्रातील छत्रपती शहाजी भक्तांनी एकच जयघोष केला. जय शहाजी…जय शिवाजी… जय संभाजी… अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला.
दरम्यान समाधीस्थळाचे पूजन पानिपतकार विश्वास पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.