• Download App
    चाचा चौधरी पुन्हा अवतरले, केवळ मनोरंजनासाठी नाही तर, नमामि गंगे प्रकल्पासाठी!!Chacha Chaudhary has been declared as the mascot of the Namami Gange programme: Ministry of Jal Shakti

    चाचा चौधरी पुन्हा अवतरले, केवळ मनोरंजनासाठी नाही तर, नमामि गंगे प्रकल्पासाठी!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केवळ लहान मुलांचेच नाही, तर मोठ्यांचेही मनोरंजन करून त्यांना शिकवण देणारे… प्रसंगी रागावून काम करून घेणारे चाचा चौधरी पुन्हा अवतरले आहेत!! यावेळी ते अवतरले आहेत, केंद्र सरकारच्या आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नमामि गंगे प्रकल्पासाठी!! चाचा चौधरी हे नमामि गंगे प्रकल्पाचे मॅस्कट अर्थात बोधचिन्ह असतील.Chacha Chaudhary has been declared as the mascot of the Namami Gange programme: Ministry of Jal Shakti

    नमामि गंगे हा गंगा शुद्धीकरणाचा त्याचबरोबर गंगेच्या पाण्याचा विविध प्रकारे वापर करण्यासाठी तयार करण्यात आलेला मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गंगेतून जलवाहतूक करण्याचीही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याचबरोबर गंगा किनाऱ्यावरच्या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या करण्याचाही यात समावेश आहे. या सर्व प्रकल्पासाठी बोधचिन्ह म्हणून चाचा चौधरी यांची केंद्र सरकारने निवड केली आहे.

    प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक प्राण कुमार शर्मा यांनी चाचा चौधरी आणि साबु या दोन व्यक्तिरेखांची निर्मिती केली. 1960, 70, 80 च्या दशकात हिंदी, मराठी, बंगाली अशा विविध भाषांमध्ये चाचा चौधरी आणि त्यांचा साबु प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या कार्टून्स स्ट्रीप, व्यंग कथा घराघरात वाचल्या जात होत्या. 1980च्या दशकात चाचा चौधरी आणि साबु यांच्यावर दूरदर्शन मालिकाही साकारण्यात आली होती. यामध्ये रघुवीर यादव या कलावंतांनी चाचा चौधरी यांची भूमिका साकारली होती.

    आता चाचा चौधरी हे नमामि गंगे प्रकल्पाचे बोधचिन्ह म्हणून गंगा शुद्धीकरणाचे तसेच पाण्याच्या विविध उपयोगांचे आणि बचतीचे धडे देणार आहेत.

    Chacha Chaudhary has been declared as the mascot of the Namami Gange programme: Ministry of Jal Shakti

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…