post mortem after sunset : आता देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार आहे. ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्यांना आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार असल्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी दिली. आरोग्यमंत्री म्हणाले की, ब्रिटिशकालीन व्यवस्था संपली आहे. Central govt allows post mortem after sunset in hospitals announced By Mansukh Mandaviya
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आता देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार आहे. ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्यांना आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार असल्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी दिली. आरोग्यमंत्री म्हणाले की, ब्रिटिशकालीन व्यवस्था संपली आहे.
नवीन प्रोटोकॉलमध्ये असे नमूद केले आहे की, अवयवदानासाठी पोस्टमॉर्टेम प्राधान्याने केले जावे आणि नियमितपणे अशी पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतरही केले जावे. या निर्णयात आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोणत्याही शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर कारणांसाठी पोस्टमॉर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग रात्रीच्या वेळी केले जाईल.
रात्री शवविच्छेदन कधी होणार नाही?
रात्री कोणत्या मृतदेहांचे शवविच्छेदन होणार नाही याचीही माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यानुसार, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असल्याशिवाय खून, आत्महत्या, बलात्कार, विकृत मृतदेह या श्रेणींमध्ये रात्रीच्या वेळी पोस्टमॉर्टम केले जाणार नाही. सरकारने या नवीन निर्णयाबाबत सर्व संबंधित मंत्रालये आणि विभाग, राज्य सरकारांना सूचित केले आहे.
या संदर्भात एका सूत्राने सांगितले की, अलीकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालयातील तांत्रिक समितीने सूर्यास्तानंतर शवविच्छेदनाचा मुद्दा तपासला. काही संस्था रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करत असल्याची चर्चा बैठकीत झाली. एका अधिकृत सूत्राने सांगितले की, तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती आणि सुधारणा लक्षात घेता, विशेषत: पोस्टमॉर्टमसाठी आवश्यक प्रकाश आणि आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता, रुग्णालयांमध्ये रात्रीच्या वेळी अंत्य-परीक्षण करणे शक्य आहे.
Central govt allows post mortem after sunset in hospitals announced By Mansukh Mandaviya
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!