व्हॉटसअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र सरकारने व्हॉटसअॅप कंपनीला दिल्या आहेत. यासाठी सात दिवसांचा अवधी दिला असून अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. Center notifies WhatsApp to withdraw new privacy policy, warning of action otherwise
प्रतिनिधी
नवी दिल्ली: व्हॉटसअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र सरकारने व्हॉटसअॅप कंपनीला दिल्या आहेत. यासाठी सात दिवसांचा अवधी दिला असून अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
व्हॉटसअॅपने जारी केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि व्हॉट्सअॅकडे उत्तर मागितले होते. त्यामुळे व्हॉटसअॅपने नवे धोरण मागे घ्यावे अशा सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिल्या आहेत. उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला ७ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे २५ मेपर्यंत व्हॉट्सअॅपला सरकारकडे बाजू मांडावी लागेल. व्हॉट्सअॅपने उत्तर न दिल्यास आम्ही आवश्यक ती पावलं उचलू, असं सरकारनं म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १८ मे रोजी व्हॉट्सअॅपला एक पत्र पाठवले आहे. १५ मेपासून व्हॉट्सअॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू झाली आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅपने स्वत:ची बाजू मांडली आहे. वापरकर्त्यांनी नवे धोरण स्वीकारले नाही तर त्यांचे अकाऊंट बंद करण्यात येणार नाही. मात्र हळूहळू त्यांना मिळणाऱ्या सुविधा बंद होतील,अशी माहिती व्हॉट्सअॅपने दिली आहे. या नव्या मोडमुळे यूजर्सला कॉल येणे बंद होईल. येणाऱ्या मेसेजला उत्तर देता येणार नाही.
Center notifies WhatsApp to withdraw new privacy policy, warning of action otherwise
महत्त्वाच्या बातम्या
- नव्या व्हेरिएंटवरील केजरीवालांच्या ट्वीटने वादाचे मोहोळ, सिंगापूर सरकारने भारतीय उच्चायुक्तांसमोर नोंदवला आक्षेप
- Covid 19 Vaccine : कोरोना लस तयार करण्याचा परवाना एकाऐवजी 10 कंपन्यांना द्या, नितीन गडकरींची मौलिक सूचना
- Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू
- आणखी एक लस : Sanofi GSK च्या कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलला लवकरच सुरुवात
- यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक