• Download App
    CBSE10th-12th exam: सीबीएसई दहावी बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्राची डेटशीट जारी ; 30 नोव्हेंबरपासून परीक्षा CBSE releases term 1 board exam 2021-2022 date sheet timetable for Class 12 students and 10 student 

    CBSE 10th-12th exam: सीबीएसई दहावी बारावी परीक्षेची डेटशीट जारी ; 30 नोव्हेंबरपासून परीक्षा

    • सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेची तारीख नुकतीच जारी करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरु होईल. तर इयत्ता बारावीच्या टर्म पहिल्या परीक्षा एक डिसेंबर पासून सुरु होईल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेची तारीख नुकतीच जारी करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरु होईल. तर इयत्ता बारावीच्या टर्म पहिल्या परीक्षा एक डिसेंबर पासून सुरु होईल. परीक्षेचं वेळापत्रक www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.CBSE releases term 1 board exam 2021-2022 date sheet timetable for Class 12 students and 10 student

     

     

    डेट शीट कशी पाहावी

    स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- cbse.nic.in ला भेट द्या .
    स्टेप 2: त्यात Whats New याच्या लिंकवर क्लिक करा.
    स्टेप 3: 10 वी किंवा 12 वीच्या लिंकवर क्लिक करा.
    स्टेप 4: आता एक पीडीएफ उघडेल, ते डाऊनलोड करा.

    परीक्षा सकाळी 11.30 वाजता 

    नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

    ऑफलाईन परीक्षा

    सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. बोर्डाने टर्म -1 परीक्षेत 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर तयार केले जातील, असं सांगितलं आहे.

    सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यास यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.

    CBSE releases term 1 board exam 2021-2022 date sheet timetable for Class 12 students and 10 student

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य