• Download App
    केरळात पाद्री थॉमस कोट्टूर सिस्टर अभयाच्या खुनात दोषी; अनैतिक संबंध लपविण्यासाठी खून केल्याचे उघड | The Focus India

    केरळात पाद्री थॉमस कोट्टूर सिस्टर अभयाच्या खुनात दोषी; अनैतिक संबंध लपविण्यासाठी खून केल्याचे उघड

    • 29 वर्षांनी निकाल; एक ननही दोषी

    वृत्तसंस्था

    तिरुवनंतपुरम: सीबीआयच्या विशेष कोर्टाने फादर थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांना सिस्टर अभयाचा खून केल्याबद्दल तब्बल 29 वर्षांनी दोषी ठरवले आहे. CBI court finds Father Thomas Kottoor, nun Sephy guilty in Sister Abhaya murder case

    न्यायमूर्ती सनल कुमार यांनी मंगळवारी हा निकाल दिला. फादर कोट्टूरला पूजापुरा तुरुंगात, तर सेफीला अटकाकुलंगारा येथील महिला तुरूंगात पाठविले आहे.

    तत्कालीन सीबीआय कोची युनिटचे डीएसपी नंदकुमार नायर यांनी चौकशी पूर्ण केली. अनैतिक संबंध लपवण्यासाठी अभयाची निर्घृण हत्या केली होती. कोट्टायममधील पियस एक्स कॉन्व्हेंटच्या विहिरीत अभयाचा मृतदेह आढळला होता.

    अभया तेव्हा कोट्टायमच्या बीसीएम कॉलेजमध्ये पूर्व पदवीची विद्यार्थी होती. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेने ही घटना आत्महत्या असल्याचे म्हटले होते. परंतु चौकशीत व खटल्यात हा खून असल्याचे स्पष्ट झाले.अभया (वय 19 ) पाणी आणण्यासाठी कॉन्व्हेंटच्या स्वयंपाकघरात गेली. तेव्हा फादर थॉमस कोट्टूर, फादर जोस पूथ्रिककायिल आणि सिस्टर सेफी यांना नको त्या अवस्थेत पाहिले.

    CBI court finds Father Thomas Kottoor, nun Sephy guilty in Sister Abhaya murder case

    त्यामुळे आणखी अब्रू जाऊ नये म्हणून सेफीने अभयाला कुऱ्हाडीने ढकलले आणि थॉमस कोट्टूर आणि जोसे पूथ्रिकॅकिलच्या मदतीने तिला विहिरीत फेकले होते. परंतु ही आत्महत्या असल्याचे भासवले होते.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…