Friday, 9 May 2025
  • Download App
    एक कोटींवर करदात्यांना दीड लाख कोटींचा परतावा | The Focus India

    एक कोटींवर करदात्यांना दीड लाख कोटींचा परतावा

    • केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड आले प्रत्यक्षच धावून

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने कोरोना काळात करदात्यांना दिलासा दिला आहे. तब्बल 1 कोटी 18 लाख करदात्यांना 1 लाख 50 हजार 863 कोटींचा रुपयांचा परतावा दिला आहे. CBDT issues refunds of over Rs 1,50,863-crores 

    कोरोनाच्या काळात अनेकांचे हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक अडचणीत अनेक जण सापडले. अशा परिस्थितीत केंद्रीय प्रत्यक्ष बोर्ड त्यांच्या मदतीला धावून आले. एक कोटींवर करदात्यांना एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत परतावा दिला.

    CBDT issues refunds of over Rs 1,50,863-crores

    केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने 1 कोटी 16 लाख 7 हजार299 प्रकरणात 47 हजार 608 कोटी परतावा दिला. 2 लाख 1 हजार 796 कार्पोरेट टॅक्स प्रकरणात 1 लाख 3 हजार 255 कोटींचा परतावा दिला आहे.

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??