• Download App
    'अत्यावश्यक औषधा'च्या नावाखाली गांजाची तस्करी, 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ; एनसीबीची कारवाई Cannabis smuggling under the guise of 'essential medicine', Assets worth Rs 1 crore seized; NCB action

    ‘अत्यावश्यक औषधा’च्या नावाखाली गांजाची तस्करी, 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ; एनसीबीची कारवाई

    वृत्तसंस्था

    मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या नावाखाली सेंद्रिय गांजाची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यात आला आहे. Cannabis smuggling under the guise of ‘essential medicine’, Assets worth Rs 1 crore seized; NCB action

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पर्दाफाश केला आहे. एनसीबीने बेलार्ड पिअर येथील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे कारवाई केली. एक कोटी रुपये किंमतीचा सेंद्रिय गांजा जप्त केला आहे.

    बॅलार्ड पियरच्या फॉरेन पोस्ट ऑफिस कार्यालयात एक पार्सल आले होते. त्या पार्सलमधून वास येत असल्याने तेथील कर्मचाऱ्याने त्याची माहिती एनसीबीला दिली. त्यानंतर एनसीबीचे पथक घटनास्थळी गेले. अधिकाऱ्याने पार्सल उघडून पाहिले असता त्यात सेंद्रिय गांजा होता. त्या पार्सलच्या वर ‘अत्यावश्यक औषधे’ असे लिहिले होते.



    एनसीबीने कारवाई करून 2 किलो गांजा जप्त केला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे, हा सेंद्रिय गांजा 5 ते 8 हजार रुपये प्रति ग्रॅम विकला जातो. या प्रकरणी एनसीबीने अज्ञात व्यक्तीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

    Cannabis smuggling under the guise of ‘essential medicine’, Assets worth Rs 1 crore seized; NCB action

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…